


व्यापारी गणेश मंडळाचा अभिनव उपक्रम..
रक्तदान शिबिरात 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान..
दिंद्रुड । प्रतिनिधी
माजलगाव तालुक्यातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी दिंद्रुड येथील बाजारपेठेत परंपरानुरुप अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. येथील सार्वजनिक व्यापारी गणेश मंडळाने सामाजिक उपक्रम म्हणून यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
दि.१२ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्रीं ची आरती व त्यानंतर भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन आयुष्मान भारत समिती महाराष्ट्र प्रमुख देवदूत डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात जवळपास ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले असून, या मंडळाच्या अभिनव उपक्रमामुळे परिसरात कौतुक केले जात आहे.
परंपरेपासून चालत आलेल्या व्यापारी गणेश मंडळाकडून प्रतिवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देशात चालू असलेला रक्ताचा तुटवडा पाहून यावेळी आगळावेगळा भव्य रक्तदान शिबिराचा निर्णय घेत शिबिराचे नियोजन केले. या शिबिरात 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले, रक्तदात्यांना बिस्किट, चहा व फळांची व्यवस्था करण्यात आली होती.
या गणेशा मंडळात मतदार संघातील राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर बोलवून त्यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात येते. विसर्जन मिरवणुकी दिवशी समस्त दिंद्रुड ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
परळी वैद्यनाथ ब्लड बँकेच्या वतीने रक्त डोनेशन व्यवस्थित रित्या करुन घेण्यात आले. रक्तदान शिबिर व्यवस्थित रित्या पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष महेश ठोंबरे, परमेश्वर ठोंबरे, व्यंकटेश कुलथे, गणेश काटकर, व्यंकटेश कटारे, नितिकेश महाजन,यश गोंडर, ईश्वर कांबळे, पांडूरंग कुलथे, चंदू शहाणे, अजय सोनवणे, अजय धुमाळ ,ओम कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.
Discussion about this post