
पाळधी शहर (प्रतिनिधी) पाळधी येथील शासकीय विश्रामगृह येथे पाळधी पोलीस स्टेशन व जीपीएस मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने सोमवार (दि. ०५) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या आपल्या जिल्ह्यातील रक्त पेढ्यांकडे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध नाही. यासाठी गावातील तरुण मित्रमंडळ, सेवाभावी संस्था व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन पाळधी पोलीस स्टेशनचे सपोनि प्रशांत कंडारे यांनी केले आहे.

तसेच रक्तदान नोंदणीसाठी ०२५८८-२५५३३३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
प्रतिनिधी :- राकेश धनगर बातम्या व प्रतिनिधी :-८२०८५३६८७७/७७९८९४९१३६
Discussion about this post