• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

बिना संगम हत्याकांडाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश लायटरवादातून खूनप्रकरणी चौघांना अटक

by
December 3, 2025
in Blog
0
0
SHARES
55
VIEWS
Ad 1

कामठी तालुक्यातील बिना संगम येथील हत्याकांडाचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

लायटरवादातून खूनप्रकरणी चौघांना अटक
सारथी महाराष्ट्राचा न्यूज/ सावनेर तालुका प्रतिनिधी :- नरेश गें कनोजे

RelatedPosts

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

खापरखेडा : सिगारेट

पेटविण्यासाठी लायटर देण्यावरून झालेल्या वादातून ३३ वर्षीय तरुणाची निघृण हत्या झाल्याची घटना २३ नोव्हेंबर २५ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिना संगम परिसरात घडली होती. या प्रकरणाचा नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ने पर्दाफाश करून चारही आरोपींना अटक केली.

अटक आरोपींमध्ये आकाश संतोष परिहार (२०, रा. बजरंग चौक, शांतीनगर), मितांशू उर्फ लक्की तुषार बुलकुंडे (२०, रा.इतवारी रेल्वे क्वार्टर्स), मनीष पांडुरंग बावणे (१९, रा. बजरंग चौक) आणि राहुल रोशन कावळे (२१, रा. बजरंग चौक, शांतीनगर) यांचा समावेश आहे. २३ नोव्हेंबर रोजी पिवळी नदी परिसरातील रहिवासी सुशीलकुमार गेडाम, आशिष गोंडाणे (३३) आणि सचिन मिश्रा हे तिघे बिना संगम येथे फिरण्यासाठी आले होते. काही वेळाने सचिन कामानिमित्त निघून गेला. त्यादरम्यान आशिष आणि सुशीलकुमार नदीत पोहून परत येत असताना आरोपी तेथे पोहोचले. त्यांनी या दोघांकडे सिगारेटसाठी लायटर मागितले. लायटर दिल्यानंतरही आरोपींनी

शिवीगाळ करत वादाला सुरुवात केली. सुशीलकुमार आणि आशिष यांनी विरोध करताच आरोपींनी दगडाने मारहाण केली. हल्लेखोरांनी सुशीलकुमारवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले, तर आशिष गोंडाणेवर सपासप वार करून त्याची हत्या केली. घटनेनंतर आरोपी पळून गेले होते. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक ४ ने हाती घेतला. माहितीच्या आधारे पथकाने एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. इतर साथीदारांची

नावे उघड केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून चार आरोपींना अटक केली. या आरोपींना पुढील कारवाईसाठी खापरखेडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश रूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, डीसीपी राहुल माकणीकर आणि एसीपी अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डिमे आणि त्यांच्या पथकाने केले

Previous Post

रिसोड शहर प्रतिनिधि नगरपरिषद निवडणूकीतसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली सकाळी साडेसात वाजता मतदान प्रारंभ झाले विविध मतदान केंद्रावर मतदारांनी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या मतदाता मतदान केंद्रावर दिसले मतदानाचा तपशीलपुरुष संख्या 7,604महिला संख्या 8,80एकुण मतदान 15;684टक्के 52.35/

Next Post

खापरखेडा येथे वन विभागाची मोठी कारवाई खेळ दाखविणारे गारुडी यांच्या कैदेतून माकडाची सुरक्षित सुटका

Related Posts

Blog

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026
173
Blog

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026
34
Blog

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026
51
Blog

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी मोरे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा दगडवाडीत भावपूर्ण वातावरणात संपन्न

August 2, 2026
12
Blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती शिरोळ येथे उत्साहात साजरी

August 2, 2026
93
Blog

घरकुल लाभार्थ्यांसाठी विशेष कॅम्प; ४ ऑगस्ट रोजी नेकनूर ग्रामपंचायतीत आयोजन

August 2, 2026
19
Next Post

खापरखेडा येथे वन विभागाची मोठी कारवाई खेळ दाखविणारे गारुडी यांच्या कैदेतून माकडाची सुरक्षित सुटका

ताज्या बातम्या

अकोट फैल पुलावरील खुनाच्या प्रयत्नाच्या प्रकरणातील चार आरोपींना नियमित जामीन

August 2, 2026

सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गावंडगाव येथील शेतकऱ्याची आत्महत्या

August 2, 2026

चांभुर्डीचे सुपुत्र दत्तात्रय दळवी यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसमवेत उत्साहात; नव्या ग्रंथालयाचे उद्घाटन

August 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In