तालुका प्रतिनिधी राजकुमार पांचाळ (9657978196)
दि. 15/09/2024 भोकर
नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या निर्देशानुसार दि.१४ व १५ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात विशेष ई-पीक पाहणी मोहीम राबविण्यात येत आहे.भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुक्यातील सर्व गावात मंडळ अधिकारी, तलाठी, कृषीसहाय्यक, पोलीस पाटील,रास्त भाव दुकानदार,कोतवाल, ग्रामरोजगार सेवक,सीएससी केंद्र चालक यांच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत भोकरचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी भोसी,जाकापूर,हस्सापूर, रायखोड,हाळदा,लामकानी व मोघाळी येथे भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व त्यांना ई-पीक पाहणी करणे बाबत मार्गदर्शन केले. सातबारा अद्यावतीकरण करने,शासकीय कामकाजासाठी पीकपेरा नोंद,पीक विमा,पीक कर्ज,शेतमाल विक्री,विविध प्रकारच्या योजना मधून मिळणारी अनुदाने यासाठी ही पीक पाहणी करणे अत्यावश्यक आहे. शासनाने ई-पीक पाहणी करण्यासाठी ७ दिवसाची मुदतवाढ दिली असून आता २३ सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करता येणार आहे.तेव्हा राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांनी त्वरित आपल्या पिकाची ई- पीक पाहणी करून घ्यावी असे सांगितले. यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,शेतकरी मित्र व शेतकरी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Discussion about this post