• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन व सेवा-वाढ मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष; संघटना निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत

by
December 4, 2025
in Blog
0
0
SHARES
52
VIEWS
Ad 1

दौंड प्रतिनिधी :~ दत्तात्रय दिलीप यादव
पदवीधर अंशकालीन शासकीय कर्मचारी कल्याणकारी संघटना – महाराष्ट्र राज्य यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्ती वयोमर्यादा वाढविणे या प्रमुख मागण्यांसाठी मागील काही महिन्यांत शासनाला मार्च २०२५, मे २०२५ आणि जुलै २०२५मध्ये तसेच त्यानंतरही वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, शासनाने याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
संघटनेच्या मते, २००३ पूर्वी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांकडून तीन वर्षे मानधन तत्वावर (३०० रुपये) सेवा घेण्यात आली होती. त्यानंतर सरळ सेवेत समाविष्ट करणे आवश्यक असताना शासनाने तो निर्णय लागू केला नाही. पुढे २००९ मध्ये १० टक्के आरक्षण जाहीर करून वेळोवेळी वयोमर्यादा वाढविणारे निर्णय काढण्यात आले. मात्र, ५५ वर्षांच्या मर्यादेमुळे या कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष सेवा ३ ते १२ वर्षांपर्यंतच मर्यादित राहत असून, हा स्पष्ट अन्याय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तसेच आंध्र प्रदेश शासनाच्या परिपत्रकाचा दाखला देत सेवा-वाढ देण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

साताऱ्यात सरळ सेवा भरती; इतर जिल्ह्यांत अंमलबजावणी नाही

RelatedPosts

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

मा. औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार २००४ मधील शासन निर्णयाप्रमाणे सातारा जिल्हाधिकारी यांनी २००६ मध्ये पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची सरळसेवेतील भरती केली होती. तथापि, महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, ही मोठी विसंगती असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

जुनी पेन्शन योजनेसाठी पात्र असतानाही वंचित

फेब्रुवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार, १ नोव्हेंबर २००५ पूर्वीची जाहिरात असलेल्या भरतीस जुनी पेन्शन योजना लागू होणे आवश्यक आहे. पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्या कालावधीतलेच असल्यामुळे त्यांना जुनी पेन्शन मिळणे अपेक्षित असताना आजतागायत ती मंजूर करण्यात आली नाही.

निवडणुकीत सज्ज; राज्यभरात २०–२५ हजार नावे नोंदणी

शासन व प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेच्या राज्य कार्यकारिणीने सर्वानुमते ठरविले आहे की, येणाऱ्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेच्या वतीने उमेदवार उभे केले जातील. पुणे, संभाजीनगर व नागपूर या तीनही विभागांत संघटना उमेदवार उतरवणार आहे.
या संदर्भात संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री. जनार्धनजी काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली असून अंदाजे २० ते २५ हजार नवीन नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती संघटनेने दिली. या कार्यासाठी संघटनेतील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमांचे काळे यांनी विशेष कौतुक केले आहे.

Previous Post

खापरखेडा येथे वन विभागाची मोठी कारवाई खेळ दाखविणारे गारुडी यांच्या कैदेतून माकडाची सुरक्षित सुटका

Next Post

रिसोड शहर काही अंतरावर गौरखनाथ मंदीर आहे तेथे महाप्रसाद व खड़ा पहारा कार्यक्रम होते अनेक भाविक भक्त प्रसाद लाभ घेतात व शहरापासून काही कि मी आहे।वातावरण शुद्ध व शांतभाविकहे मंदीर उंच टेकादावरआहे दत्त जयंती निमिति शहरातीपालखी निघती व अनेक भाविक भक्त दर्शन लाभ घेतात

Related Posts

Blog

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
5
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी
Blog

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026
12
Blog

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026
8
Blog

गणेश विसर्जनातून मिळणारा जीवनाचा संदेश

September 22, 2026
7
पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला
Blog

पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; डीजेच्या ध्वनीप्रदूषणाला आळा घाला

September 22, 2026
18
मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा
Blog

मालेगाव तालुक्यात खासदार अनुप धोत्रे यांचा दुष्काळ पाहणी दौरा

September 22, 2026
20
Next Post

रिसोड शहर काही अंतरावर गौरखनाथ मंदीर आहे तेथे महाप्रसाद व खड़ा पहारा कार्यक्रम होते अनेक भाविक भक्त प्रसाद लाभ घेतात व शहरापासून काही कि मी आहे।वातावरण शुद्ध व शांतभाविकहे मंदीर उंच टेकादावरआहे दत्त जयंती निमिति शहरातीपालखी निघती व अनेक भाविक भक्त दर्शन लाभ घेतात

ताज्या बातम्या

नवेगावात नवीन अंगणवाडीचे लोकार्पण

September 22, 2026
मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

मुसरामगुड्याचा मुख्य रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; तातडीने डांबरीकरणाची मागणी

September 22, 2026

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र नाराज

September 22, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In