गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या आपल्या लाडक्या बाप्पाच्या गणेशोत्सव सोहळ्याची सांगता आज होत आहे मिरजेसह ग्रामीण भागातील सार्वजनिक मंडळांच्या श्री गणेश मूर्तींची विसर्जन आज भव्य मिरवणुकीने होत आहे मिरजेची परंपरा असलेली विसर्जन मिरवणूक आता अवघ्या काही तासांवर आली आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधी नी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले कि महापालिकेच्या वतीने विसर्जसाठी जय्यत तयारी केली असून मिरजेत श्री गणेश तलाव आणि कृष्णा घाट परिसरात ६ क्रेन सह तराफ्याची सोय केली असून जवळजवळ २५० गणेश मूर्तींचे विसर्जन होणार आहे. अत्यावश्यक सेवेसाठी महापालिका रुग्णालयात खतांची आणि उपचारांची सोय करण्यात आली आहे. मिरज मार्केट परिसर कृष्णा घाट तसेच श्री गणेश तलाव परिसरात अग्निशमन विभागाच्या गाड्या सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाने मिरवणूक मार्गावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला तब्बल हजारांच्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तावर तैनात असतील मिरज विभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा हे स्वतः मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवून असतील. मिरवणूक मार्गावर विविध पक्ष आणि संघटना यांच्या स्वागत कमानी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आज विसर्जन मिरवणुकीमध्ये लाखो नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे विविध सामाजिक संघटनांनी काही ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्याची खाद्यपदार्थांची व्यवस्था केली आहे. हि विसर्जन मिरवणूक गतवर्षी तब्बल २५ तास चालली होती यंदाही अशा प्रकारे मिरवणूक पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे.
Discussion about this post