टाळ मृदुंगाच्या गजरात गणपती बाप्पाला निरोप
डिजे संस्कृतीला फाटा..
चामोर्शी :
तालुक्यातील मुरखळा (माल ) येथील आदर्श गणेश मंडळांनी गणेशचतुर्थीला गणपतीबाप्पाची प्रतिष्ठापना केली व अनंत चतु्थीला गणपती बाप्पाला टाळ मृदुंगाच्या गजरात बाप्पाला निरोप देत डीजे संस्कृतीला
फाटा देत पर्यारणमुक्त वातावरणात मोठ्या भक्तीभावाने ‘ गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ‘ म्हणत महिला , पुरुष , शालेय विद्यार्थी सहभागी होऊन मुखी हरिनाम घेत नाचत मिरवणूक काढण्यात आली.
याचा आनंद बाळगोपलांनी घेतला वारेमाप होणारा खर्च , पर्यारण , यात ज्वलंत समस्या लक्षात घेऊन मंडळांनी सर्वांना सहभगी करुन घेतले. यावेळी हभप धनराज महाराज नागापुरे ,अनिल मंगर , मुन्ना गटलेवार, राजू झाडे ,गुणाजी पोरटे , डोमदेव राऊत ,रघुनाथ
चुदरी,बाबुराव धानोरकर ,हरबा गाडेमोडे , दुमाजी कोहपरे, रुपेश चुदरी, लक्ष्मी सालोरकर , माया लाड ,सुधाकर लोणारे ,सोनी तुंबडे,राधा तुंबडे ,विभा तूंबडे,शामल तुंबडे ,रुपाली गटले वार,गीता गेडेकर ,गीता पोरटे, रेखा राऊत ,उर्मिला चुदरी,
पुष्पा नागापुरे , पुष्पा देशमुख ,वंदना राऊत ,शीतल पोटे ,वैशाली गा डेमोडे ,प्रांजली मिसार ,पल्लवी पोटे, दिनेश मंगर , नागेश भोपये ,अतुल चुदरी ,उमाकांत मंगर ,संतोष पोटे , यासह आदर्श गणेश मंडळ पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
Discussion about this post