सुरेगाव रस्ता विविध कार्य सह. (विकास) सेवा संस्था मर्यादित
सुरेगांव रस्ता ता.येवला जि. नाशिक
वार्षिक सर्व साधारण सभा
(फक्त सभासदांसाठी)
दि. ०३/०९/२०२४
संस्थेच्या सर्व सन्माननीय सभासद बंधु-भगिनीना कळविण्यात येते की, आपल्या संस्थेची वार्षिक सर्व साधारण सभा बुधवार दि. २५/०९/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता मारूती मंदिर सुरेगांव रस्ता येथे संस्थेचे चेअरमन श्री. गजानन वाल्मीक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली खालील विषयांचा विचार विनिमय करण्याचे आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी सभेस अवश्य उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
सभेपुढे येणारे विषय *
१) मा. अध्यक्षसाहेब यांना अध्यक्ष स्थान स्विकारण्यास विनंती करणे.
२) मागील वार्षिक सर्व साधारण सभेचे प्रोसिडींग वाचुन मंजुर करणे.
३) कलम (७५) (२) (एक) संस्थेच्या संचालक मंडळ, सदस्य, व कुटुंबातील सदस्यास संस्थेने दिलेल्या कर्जाची व परत फेडीची
दि.३१/३/२०२४ रोजी शिल्लक राहिलेल्या कर्ज रक्कमेची माहिती देणे बाबत.
४) कलम (७५) (२) (दोन) संस्थेने आर्थिक वर्षात केलेल्या कामकाजाचा वार्षिक अहवाल वाचन करणे बाबत.
कलम (७५) (२) (पाच) २०२३-२०२४ चा लेखापरिक्षण अहवालाचे वाचन करणे. ५
७) कलम (७५) (२) (आठ) २०२४-२०२५ या वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देणे बाबत विचार विनिमय करून निर्णय घेण, विवरणपत्राची माहिती देणे.
६) कलम (७५) (२) (सहा) २०२२-२०२३ चा लेखापरीक्षण दोषदुरूस्ती अहवालाचे वाचन करणे,
८) कलम (७५) (२ अ) (आठ) कलम ७९ अन्वये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे सादर करावयाच्या विवरणपत्राची माहिती देणे.
९) कलम (७५) (२ अ) नुसार सन २०२४-२०२५ करीता नामिकेमधील राज्य शासनाने मान्यता दिलेल्या लेखापरीक्षकांची
नेमणूक विचार विनिमय करूण निर्णय घेणे.
१०) सन २०२४-२०२५ करीता सभासदाची पत ठरविणे व बँकेकडून कर्ज मागणी बाबतचा विचार करण्याचा अधिकार पंचकमेटीस देणे बाबत.
११) डेडस्टॉक झिजेस मान्यता देणे बाबत.
१२) संगीय संस्थेवर प्रतिनिधी पाठविणे असल्यास किंवा मतदानाचा हक्क देण्यासाठी तो निर्णय करण्याचा अधिकार संचालक मंडळाला देणे बाबत.
१३) सभासद थकबाकी वसुली बाबत विचार विनिमय करणे बाबत.
१४) मा. अध्यक्षसाहेब यांचेपुर्व परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयांचा विचार करणे.
** आपले विनित *
श्री. गजानन वाल्मीक चव्हाण (चेअरमन)
श्री. माधव बापु गायके (व्हा. चेअरमन)
श्री. चंद्रभान रंगनाथ वाघचौरे (मुख्य सचिव)
सुरेगांव रस्ता विविध कार्य सह. (विकास) सेवा संस्था मर्यादित, सुरेगांव रस्ता
विशेष सुचना : १) कोरम अभावी सभा तहकुब झाल्यास सभा त्याच ठिकाणी एक तासांनंतर घेण्यात येईन. २) ज्या सभासदांना सभेसाठी काही विधायक
सुचना मांडावयाच्या असतील त्यांनी दि. २२/०९/२०२४ पर्यंत ऑफिस वेळात सचिव अगर चेअरमन यांच्याकडे लेखी आणून द्यावेत. ऐनवेळी आलेला ठराव व सुचना
स्विकाल्या जाणार नाही.
Discussion about this post