विविध गणेशोत्सव मंडळांनी प्रयोगशील शेतकरी बालाजी लोहकरे यांचे शेती संदर्भात जनजागृती पिक चर्चा सत्राचे आयोजन करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला..
मोहोळ तालुका प्रतिनिधी/
मोहोळ तालुक्यातील बेगमपुर येथील प्रयोगशील युवा शेतकरी स्वतः च्या शेतात विविध पिकांची आधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून इतरही तरुणांना शेती मातीशी एकरुप
होऊन नोकरीच्या मागे न लागता आपल्या वडिलोपार्जित शेतीला नोकरी समजून व्यावसायिक दृष्टीने यशस्वी करण्यासाठी शेतकरी साक्षरता मोहीम मागील दहा वर्षे करत आहेत. याचा अनेक तरुणांना फायदा झाल्याने त्यांचे सोशल मीडियावर पन्नास हजार फॉलोअर्स निर्माण झाले आहेत.
या वर्षी विविध गणेश मंडळांनी बालाजी लोहकरे यांना आमंत्रित करुन
विविध करमणूक कार्यक्रमांना बगल देऊन शेतकरी साक्षरतेच्या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले,
तरुणांनी गणेशोत्सव काळात प्रेरणादायी कौतुकास्पद उपक्रमांचा नवीन पायंडा सुरू केल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.
Discussion about this post