गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने 6 केंद्रातील 102 जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा संपन्न.
चामोर्शी:-आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने तालुक्यातील १०२ जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक गट साधन केंद्र चामोर्शी येथे दुपारी तीन ते पाच या वेळेत घेण्यात आली.
सभेमध्ये प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली,शालेय मोफत गणवेश योजना(Scout Guide -110 रू) या दराने गणवेश शिलाई करून देण्यास तयार असल्याबाबत/नसल्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव सोबत आणणे,सयुक्त शाळा अनुदान सन 2024-25 (50 टक्के वितरणाबाबत.
दिनांक 25.09.2024 पर्यंत सादर करण्याबाबत,महावाचन उत्सव उपक्रम,NILP अंतर्गत असाक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी व जोडणी,अध्ययन अध्यापन साक्षरता वर्ग,साक्षरता सप्ताह उपक्रम,
मुख्याध्यापक स्वतंत्र बैंक खाते उघडणे,नियामक परिषद व कार्यकारी समिती बैठका इत्यादी अहवाल,आदर्श शाळा कृत्ती आराखडा 2024-25 (जि. प. शांळा गपापूर रै),PM SHRI शाळा, भेंडाळा व नुतन चामोर्शी (SQAF, Survey form),NAS कार्यक्रम,माता-पालक गटांची पुनर्रबांधणी,ग्रंथालय निर्मिती,
नवोदय/शिष्यवृत्ती सराव परीक्षां उपक्रम,विद्यार्थी विद्यार्थीनींच्या सुरक्षा विषयक उपाय योजनेअंतर्गत काटेकोर अंमलबजावणी केंद्र संकलन (सखी सावित्री समिती,तक्रारपेटी,विद्यार्थी सुरक्षा समिती,CCTV Camera,शिक्षक शिक्षकेत्तरं चारित्र पडताळणी प्रमाणपत्र),जॉली फोनिक्स उपक्रम इयत्ता 1 ली व 2 री, आंतरवासिता उपक्रम,समाज कल्याण,
शिष्यवृत्ती महा DBT Portal वर रजिस्ट्रेशन करणे, Online करणे व विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती माहिती,सभेचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक यशवंत टेंभुर्णे गटशिक्षणाधिकारी चामोर्शी,प्रमुख उपस्थिती केंद्र प्रमुख राजेश कोत्तावार, गुरूदास गोमासे,वंदना ठवरे,चित्रलेखा खोब्रागडे,
पुरुषोत्तम पिपरे,मानिक वरपडे,गटसमन्वयक चांगदेव सोरते,विषय साधनव्यक्ती विवेक केमेकर,कालिदास डोंगरे,घनश्याम वांढरे,वंदना चलाख व सरलक्ष्मी यामसनी उपस्थित होते.
मुख्याध्यापक सभा यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व संसाधन शिक्षक व नियोजित सभेकरीता उपस्थित सर्व मुख्याध्यापक यांनी सहकार्य केले.
Discussion about this post