मराठवाड्याच्या विकासात स्वर्गीय शिक्षण महर्षी अंकुशराव जी टोपे साहेब यांचे योगदान मोलाचे” डॉ कन्नूलाल विटोरे यांचे प्रतिपादन..
18 सप्टेंबर रोजी शिक्षण,सहकार महर्षी माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव जी टोपे साहेब यांच्या जयंतीनिमित्त श्री लक्ष्मणराव माधवराव जाधव मत्स्योदरी विद्यालय गुंज बुद्रुक येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
मॉडेल कॉलेज घनसावंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ कन्नूलाल विटोरे यांनी आदरणीय स्वर्गीय अंकुशराव जी टोपे साहेब यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की,”मागासलेल्या मराठवाड्यात शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात क्रांती घडवून आणली.
मस्त्योदरी शिक्षण संस्था, समर्थ सहकारी साखर कारखाना,सागर कारखाना यशवंत सूतगिरणी,दूध महासंघ आधीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देऊन तसेच रेल्वे सिंचन विविध क्षेत्रात अमोघ बदल क्रांती घडवून आणली.
भूमिपुत्रांना, शेतकऱ्यांना न्याय दिला. आमदार, खासदार पदे भूषवत विकास कार्य केले. सहकार क्षेत्रात शिस्त आणि समर्पण भावनेने कार्य केले.अध्यक्षस्थानी माजी सरपंच श्री तौर ,मुख्याध्यापक श्री दिलीप जी जगरवाल यांनीही साहेबांच्या व्यक्तिमत्त्वातील पैलू उलगडत शिक्षण क्षेत्रातील आदर्श स्थापित केला आज त्यांच्या विचारांची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
श्री खरात श्री परमेश्वर घुंगासे,श्री खरात, श्री काळे,श्रीमती पवार सह उपस्थित गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक विद्यार्थी विद्यार्थिनी.मराठवाड्याच्या विकासात स्वर्गीय साहेबांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे.जालना जिल्ह्यातील शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे.आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असे साहेबांचे व्यक्तिमत्व आहे.
Discussion about this post