
साठ वर्षापासून घरकुलासाठी भोई समाजाचा संघर्ष..
रिपब्लिकन सेनेची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..
उमरखेड तालुक्यातील मौ. देवसरी, खरुस (बु), चातारी व बिटरगाव (बु) येथील भोई समाज बांधव अनेक वर्ष्यापासून घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी सातत्याने संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाकडे मागणी करीत असून,
घरकुल योजनेचा लाभ हा गावातील सधन व संबंधातील व्यक्तींना देण्यात येत आहे.
भोई समाज बांधव हे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास असून त्यांना जाणीवपूर्वक अनेक वर्ष्यापासून घरकुल योजने पासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप सदरील गावातील भोई समाज बांधवाच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी व घरकुला पासून वंचित राहिलेल्या भोई समाजातील लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, शहराध्यक्ष शुद्धोधन दिवेकर, राजू आगिरे, ता.अध्यक्ष गौतम नवसागरे, ता. उपाध्यक्ष भीमराव खंदारे, ता. कार्याध्यक्ष साहेबराव कदम, शहर संघटक नंदु इटकरे व देवसरी, खरुस (बु), चातारी व बिटरगाव (बु) येथील भोई समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post