काँग्रेसच्या तासवडे टोलनाक्यावरील टोलविरोधी आंदोलनाला यश :१०० टक्के टोल माफीचे NHAI कडून पत्र
प्रतिनिधी: राहुल साळुंखे
पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर काल माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काल सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ०३ वाजेपर्यंत करण्यात आलेल्या आंदोलनास यश मिळाले आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदारी कंपनीकडून तासवडे टोलनाका परिसरातील 20 किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना शंभर टक्के टोलमापी करण्यात आली. असून तासवडे टोलनाक्यावर जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना २५% टोल माफी जाहीर केली आहे. त्याचबरोबर आणखी २५ टक्के टोलमाफी मिळावी यासाठी महामार्ग प्राधिकरणा कडून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काल टोल नाक्यावर करण्यात आलेल्या आंदोलनास आमदार विश्वजीत कदम यांच्यासह सातारा सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली होती. पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील तासवडे टोलनाक्यावर सोमवारी साडेपाच तास आंदोलन करत वाहने विना टोलची सोडून देण्यात आली.
विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सकाळी १० वाजल्यापासून तासवडे टोलनाका परिसरात स्वतः ठाण मांडून साडेपाच तास आंदोलन केले. यावेळी जोपर्यंत टोल माफीचा निर्णय घेतला जात नाही. तोपर्यंत आंदोलन केले यावेळी महामार्ग प्राधिकरणाकडून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना लेखी आश्वासन देण्यात आले. आणि त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.तासवडे परिसरातील २० किलोमीटर अंतरातील सर्व गावांना टोल सवलती देण्यात आली. या निर्णयामुळे कराड तालुक्यातील उंडाळे विभागातील गावे वगळता अन्य २० किलोमीटर अंतरातील सर्व गावांना याचा फायदा झाला आहे. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील काही गावांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. २०किलोमीटर अंतरातील गावातील लोकांना याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर देशभरातील तासवडे टोल नाक्यावरून जाणाऱ्या देशभरातील सर्व वाहनांना २५% टोल माफी जाहीर करण्यात आली आहे.
हे यावेळी मान्य झालेल्या मागण्या
१) पुणे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत टोल मध्ये ५०% सूट मिळावी ही प्रमुख मागणी होती. आजपासून प्राधिकरणाने २५% सूट देण्याचे मान्य केले. व उर्वरित २५ टक्के सूट हायवेच्या वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्रीय मंत्री स्तरावर चर्चा करून पुढील आठवड्यात आठवड्यात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.
२) तसेच टोलनाका परिसरातील २० किलोमीटर अंतराच्या परिसरातील स्थानिक वाहनांना टोलमाफ करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक विचार होऊन आजपासून टोलचा २० किलोमीटर अंतरातील वाहनांना टोल माफ करण्याचे मान्य केले. पोलिसांकडून आंदोलन ताब्यात नंतर सुटका, टोलमाफीच्या मागणीसाठी ०३ तास आंदोलन केल्यानंतर ही मागणी मान्य होत नसल्याने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत महामार्गावर वाहने अडवली. यावेळी काँग्रेस सांगलीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या सह काही काँग्रेसकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.या आंदोलनास माजी मंत्री आमदार विश्वजीतजी कदमसाहेब,माजी जि. प.सदस्य उदयसिंहदादा शिंदें,मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोहर शिंदे, कराड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवास थोरात (जि.प.सदस्य) ,सातारा जिल्हा काँग्रेसचे सचिव अतुल थोरात तसेच सातारा सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Discussion about this post