दौंड तालुक्यातील विठ्ठलवाडी शाळेत आईचं झाड संकल्पना
दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विठ्ठलवाडी या ठिकाणी आईचं झाड या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना 70 रोपांचे वाटप करण्यात आले. वृक्ष देताना यामध्ये वड पिंपळ, चिंच, आवळा व कडुलिंब या प्रकारची देशी वृक्ष देण्यात आले.
दिलेल्या 70 विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडील पालकांबरोबर हे झाड घराच्या अंगणात, शेतात लावले आहे. दिलेले वृक्ष झोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्याचे झाड सर्वात मोठे होईल त्यांना बक्षीस सुद्धा ग्रुपच्या वतीने जाहीर करण्यात आले. त्याचं झाड सर्वात मोठे होईल प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी 1000, 500 व 300 रुपये रोख व एक सर्टिफिकेट ग्रुपच्या वतीने देण्यात येणार आहे.
सदर रोपे वृक्षारोपणासाठी केडगाव येथील व्यापारी काईट मल्टीस्टोरचे व ग्रुप सदस्य नरेंद्रशेठ गांधी आणि त्यांची आई स्व. इम्रतबाई बाबूलाल गांधी यांच्या स्मरणार्थ दिली. नरेंद्र शेठ गांधी यांचे आभार यांनी वृक्षारोपणासाठी रोपे दिली, शाळेमध्ये आईचं झाड ही संकल्पना राबविली, मुलांमध्ये वृक्षारोपणाबद्दल आवड निर्माण केली त्याबद्दल शाळेचे प्राध्यापक सर्व शिक्षक वर्ग यांचे आभार, दिलेले झाड आपल्या अंगणात लावले त्याबद्दल सर्व पालक वर्गांचे आभार… अशी माहिती एक मित्र एक वृक्ष अध्यक्ष प्रशांत मुथा यांनी दिली.
प्रतिनिधी- कानिफनाथ मांडगे ९८९०९५४१३२
Discussion about this post