सरकारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शनिवार रविवार सुट्टी असते. आणि काम केल्यानंतर त्याचा पगार मिळणार असतो .
परंतु शेतकरी ,मजूर वर्गाचा असं नाही.
तुम्ही कितीही कष्ट घ्या. त्या मेहनतीचा फळ मिळेलच असं नसतं. कारण शेती हा निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे .
आज शेतात काम करणारे व गुरंढोरं सांभाळणाऱ्या कुटुंबाची भेट घेतली .
यावेळी ऊन वारा पाऊस असताना देखील कंपल्सरी त्यांना शेतात यावच लागतं. जनावरांच्या चाऱ्यासाठी त्यांना हे करावाच लागतं . परंतु त्यांच्या दुधाला कवडीमोल भाव आहे याची खंत आज या पती-पत्नी व्यक्त केली.
अशा संवादातून लोकांचे ,शेतकऱ्यांचे प्रश्न समजतात आणि भविष्यात या प्रश्नावर मनापासून लढा देणार आणि न्याय मिळवून देणार.




Discussion about this post