*श्री क्षेत्र हनुमान टाकळी ची राहाड यात्रा उत्साहात संपन्न.
(मुकुंद आसाराम गायकवाड)पाथर्डी तालुका प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथे रहाड यात्रा संपन्न झाली. या यात्रेत पेटत्या विस्तवावरून अनवाणी पायाने चालण्याची परंपरा आहे गटारी अमावस्येच्या दिवशी या ठिकाणी हनुमानाचे मंदिर सापडलं होतं त्यानिमित्ताने दरवर्षी याच दिवशी ही यात्रा भरते या ठिकाणी दरवर्षी अशीच भाविकांची लांबच लांब रांग लागते ती रांग असते पेटत्या विस्तावावरून अनवाणी चालण्यासाठी देवाजवळ केलेला नवस पूर्ण झाल्याने आणि श्रद्धेपोटी विस्तवावरून चालण्याची परंपरा हनुमान टाकळी येथे जवळपास 250 वर्षापासून जपली जात आहे या यात्रेला जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यामधून देखील भाविक मोठ्या संख्येने महाराष्ट्रभरातून भाविक आलेले असतात हनुमान दैवत बल शक्तीचे प्रतीक मानले जाते समर्थ रामदास स्वामी तालुक्यातील वृद्धेश्वर तिसगाव श्री क्षेत्र मढी क्षेत्री आली असल्याचे धर्मग्रंथांच्या संदर्भात आधारे सांगितले जाते याच काळात हनुमान टाकळी येथे विधिवत गोमनीय हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे सांगितले जाते.
यात्रेच्या दिवशी मंदिराच्या समोर 12 फूट लांबीचा दोन फूट खोल अडीच फूट रुंद चर खोदला जातो त्याच बोरीच्या झाडाच्या लाकडं पेटवली जातात आणि भावीक पेट त्या पेठत्या विस्तवावरून चालतात नवस हाच मुळात अंधश्रद्धेचा भाग असून पेटत्या विस्तावावरून वेगाने चालत गेल्यास पायाला चटका बसत नाही.
देवस्थानचे अध्यक्ष रमेश आप्पा महाराज व दादा महाराज नगरकर यांच्या हस्ते अग्निपूजा होऊन रहाड खेळण्यास प्रारंभ झाला.
यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी सुभाषजी दगडखैर साहेब यांचे वतीने महाप्रसादाचे आयोजन केलेले होते.यात्रे निमित्त महाराष्ट्र भरातून भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post