
छायाचित्र ओळ….सिल्लोड महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री अविनाश राऊत सर यांना गोंदेगाव तर्फे निवेदन..
प्रतिनिधी….सोयगाव तालुक्यातील बनोटी ३३ के व्ही विज केंद्रांतर्गत ३२ गावे येतात येथुनच विजपुरवठा होत असुन बनोटी गोंदेगाव सर्कल मध्ये महावितरण विज बिल फुल मात्र वारंवार विज गुल होत असल्याने विज ग्राहक महावितरन कंपनीच्या जाचाला कंटाळून गेले आहे त्यामुळे ग्रामस्थांनी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती व गोदेंगाव येथुन ह्या मोहीमेस सुरवात करण्यात आली होती.
बनोटी गोदेंगाव सर्कल मध्ये दर पाच मिनिटांत लाईट लपंडाव खेळत असते त्यामुळे लहान मुले,अभ्यास,बुडतो,मोलमजुरी करून घेतलेल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे,
मुलांच्या शिक्षणासाठी महीलांनी गळ्यातील मनी मंगळसूत्र विकुन घेतलेले संगणक खरेदी केलेली आहे परंतु वेळोवेळी विज पुरवठा खंडित होत असल्याने व इतर वस्तू चे नुकसान होते,त्यामुळे महिला,लहान बालक,व्यापारी,
घरातील आजारी व्यक्ती,विज पुरवठा खंडित झाल्याने पाच मिनिटे देखील झोपु शकत नाही रात्रीच्या वेळी विज पुरवठा खंडित झाल्याने घरासमोर अंगणात गोदेंगाव येथील शिवा आयुब तडवी या मुलास सर्पदंश देखील झाला होता,तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आजारांचे सुद्धा प्रमान वाढले आहे,ग्रामीण भाग असल्याने डास मछर,इतर रोग राई पसरल्याची येथील विज ग्राहकांनी व ग्रामपंचायत मार्फत बनोटी येथील इंजिनिअर व विज
कर्मचारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा विजकंपनी तर्फे कुठल्याही प्रकारची उपाययोजना राबविण्यात आलेली नव्हती बनोटी गोंदेगाव सर्कल मधील विज ग्राहकांमध्ये प्रचंड संतापची लाट पसरली असल्याने त्यामुळे गोंदेगावकरांनी महावितरण कंपनीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवुन निवेदनावर जवळजवळ गोंदेगाव करांनी ४५० विजग्राहक यांच्या सह्या केल्या आहेत.
गोदेंगाव येथे विज ग्राहक जवळपास आहेत सदरील निवेदन कार्यकारिणी अभियंता सिल्लोड श्री अविनाश राऊत साहेब जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना गोंदेगाव यांच्या वतीने निवेदन दिले व सिल्लोड कार्यकारी अभियंता श्री अविनाश राऊत सर यांच्या सोबत चर्चा केली व साहेब सांगितले की मी तात्काळ बनोटी,गोंदेगाव संदर्भात तात्काळ विज सुरुळीत करण्या संदर्भात आदेश दिले आहेत व लवकरात लवकर विज सुरळीत होइल असल्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री प्रविण वाघ यांनी सांगितले.
तरी बनोटी गोदेंगाव सर्कल मधील वेळोवेळी विज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी उपाययोजना राबविण्यात यावे जर वेळोवेळी विज पुरवठा खंडित होतच राहीला तर बनोटी गोदेंगाव सर्कल मधील विज ग्राहक उपोषणाला बसणार असा इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post