महाराष्ट्रा राज्यात बदलापूर व पुणे जिल्ह्यातील तालुका मळद गांवात घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक पाचपुते जिल्हा अध्यक्ष ज्ञानमाता सेवाभावी संस्था यांनी आज भास्कर पाटील शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद यांना ई-मेल द्वारे निवेदन दिले आहे.खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवने,शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी,तक्रार पेटी, सखी सावीत्री समिती बाबतच्या तरतुदीचे अनुपालन,विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गडन,राज्य सदस्य विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती यांनची अंमलबजावणी करण्याची मागणी दीपक पाचपुते यांनी गट भास्कर पाटील शिक्षण अधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे. दि.७ एप्रिल २०१६,दि.०५ मे २०१७, दि.१० मार्च २०२२,दि.१३ मे २०२२ व दिनांक २१ ऑगस्ट २०२४ च्या परिपत्रक कायदयाचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मागणी केली आहे. खाजगी शाळा व सरकारी शाळा मध्ये हया कायदया प्रमाणे तातडीने गटशिक्षण आधिकारी यांनी पत्रव्यवहार करून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. जेणे करून अशा घटना भविष्यात घडणार नाही आणि जे संस्था चालक व मुख्याध्यापक हे ह्या शासनाच्या परिपत्रक ,आदेशाचे उल्लंघन करतील त्याच्या वर या कायदयाने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे…..
Discussion about this post