
तालुका मुरबाड दि.20-9-2024.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील 44 विधानसभा मतदार संघामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशानुसार घोंगडी बैठकीच्या माध्यमातून शिव, फुले, आंबेडकरी विचारांची पेरणी या मतदार संघात करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील यांनी सांगितले.
मुरबाड शिवनेरी विश्राम गृह येथे 19 सप्टेंबर रोजी सायं 5 वाजता घोंगडी बैठकी संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केली होती या बैठकीचे आयोजन मुरबाड तालुका राष्ट्रवादी ओबीसी अध्यक्ष शिवाजी धानके यांनी केले होते तसेच घोंगडी बैठकी साठी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी उपाध्यक्ष मधुकर विसपुते हे निरीक्षक होते
तर बदलापूर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे हे या बैठकीचे मार्गदर्शक होते तसेच मेहर अजबे , सतीश गडगे मुरबाड तालुका कार्याध्यक्ष विलास भावार्थे , हंशराज झुंजाराव,योगेश पाटील, काशिनाथ माळी, सुरेश भालेराव इ मान्यवर उपस्थित होते तसेच पत्रकार बंधू तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पहिला टप्पा 2 सप्टेंबर तसेच दुसरा टप्पा 11ते 16 सप्टेंबर पर्यंत तर तिसऱ्या टप्प्यात 27 सप्टेंबर ते 2ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे. या माध्यमातून छत्रपती शिवरायांचे स्वराज्याचे विचार, फुले शाहू आंबेडकर पुरोगामी विचार, संत थोर पुरुषांच्या आत्मचरीत्राच्या सत्ताधाऱ्यांनी केलेला घोर अपमान या सह अनेक मुद्दे घेऊन शिव, फुले, शाहू, आंबेडकर विचारांची पेरणी
बैठकीच्या शुभारंभ प्रसंगी परिषद मध्ये जिल्हा अध्यक्ष बोलत होते या बैठकीला तालुका अध्यक्ष शिवाजी धानके यांनी सांगितले कि मतदार संघातील 50 गावा मध्ये करण्यात येणार आहे या अभियानादरम्यान ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष राजापूरकर डॉ. शिवाजी विसपुते व किरण पवार यांच्यासह 18वक्ते पक्षाच्या जेष्ठ
पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आव्हान मुकेश पाटील यांनी केले आहे. घोंगडी बैठकीच्या माध्यमातून पक्षाचे ध्यय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान आणि ओबीसी साठी केलेल्या कामासंदर्भात माहिती या बैठकीच्या माध्यमातून देण्यात आली.
*मुरबाड विधानसभे साठी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटातून तसेच महाविकास आघाडीतून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना बदलापूर शहर अध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी सांगितले कि मीच उमेदवार असणार आणि पुढचा आमदार मीच होणार.
अडीच वर्ष मी मुरबाड विधानसभा क्षेत्रात कार्य करत असून मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे मला विकास काय असतो ते माहित असून गेल्या 45गोटीराम पवार व किसन कथोरे यांनी कोणताच विकास केला नाही असे प्रतिपादन शैलेश वडनेरे यांनी केले.
Discussion about this post