उजनी धरण आज दि. 4 रात्री शंभर टक्के भरेल असा अंदाज आहे. आज दि. 4 सायंकाळी पाच वाजता उजनी धरण 91 टक्के भरले होते. आज रात्रीतून धरण शंभर टक्के भरेल असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे उजनी धरणाचे 14 दरवाजे उघडून रात्री आठ वाजले पासून 40 हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून धाराशिव जिल्ह्याला उजनी धरणाचे पाणी पुरवले जात आहे . त्यामुळे शहरात पाणी टंचाई चा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र उन्हाळा येताच उजनी धरणाचे पाणी कमी झाले की धाराशिव ला पाणी पुरवठा होत नाही , परंतु आत्ता उजनी धरण पूर्ण भरले असल्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत धाराशिव चा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे
Discussion about this post