अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला बिबट्यांचे वास्तव्ये. रहिवाशांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
नांदगाव (नाशिक) प्रतिनिधी:-
नांदगाव तालुक्याला लागून असलेल्या अगस्तीमुनींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अंकाई किल्ल्याच्या पायथ्याला पर्यटकांना घनदाट झाडीत दि .४ बिबट्याचे दर्शन झाले आहे.अंकाई किल्ल्यावर सध्या पर्यटकांचे प्रमाण अधिक आहे नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या किल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या पर्यटकाना बिबट्या नजरेत पडला आहे.
अंकाई -टंकाई किल्ल्याजवळ दि ४ रोजी ट्रेकिंग करत असताना मनमाड न पा.चे माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, प्रवीण व्यवहारे किरण भाबड,गणेश वाहळे, डॉ. भागवत दराडे, यांना बिबट्या निदर्शनात आला. त्यावेळेस वन्यप्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी यांनी संगीतले की अंकाई, विसापूर, कातरणी, कातरवाडी, वडगांव पंगू, रापली परिसरातील नागरिकांनी परीसरात शेती काम करत अअंकाईसताना सावधानी बाळगावी असे त्यांनी आव्हान केले आहे.
तसेच श्रावण महिना चालू झाला असून या काळात नागरीक, भाविक देवदर्शनाला व पर्यटनाला अंकाई- टनकाई किल्ल्यावर येतात. त्यामुळे सगळ्यांनी ट्रेकिंग, देव दर्शन,डोंगर भ्रमंती करताना किंवा डोंगरावरती चढताना व परिसरात रात्री अप रात्री काम करत असताना सावधानी बाळगावी असे वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली. दि ४ ऑगस्त रोजी सकाळी सात वाजता अनकई डोंगरावरती ट्रेकिंग करत असताना परिसरात दोन-तीन बिबटे असल्याची माहिती वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी दिली. श्रावण महिण्यात अंकाई किल्यावर आगस्तीमुनींच्या व महादेवाच्या दर्शनाला जाणार्यांचे प्रमाण अधिक असते, तरी सर्व भावीकांनी व पर्यटकांनी तसेच नागरीकानी सतर्क राहण्याचे वनविभागाने देखील आवाहन केले आहे.
Discussion about this post