प्रा किसन चव्हाण यांच्या उमेदवारीचे स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी केले जोरदार स्वागत. ..वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी विधानसभेच्या अकरा उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली त्यात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक महासचिव प्रा किसन चव्हाण यांची शेवगाव पाथर्डी या विधान सभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यामुळे मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी आज क्रांती चौकात फटाके वाजून जोरदार स्वागत केले आणि प्रा किसन चव्हाण यांना प्रस्थापित कारखानदार आणि शिक्षणासम्राटांच्या विरोधात लढण्यासाठी स्वाभिमानी शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख अरुण झांबरे पाटील, कल्याणराव भागवत सर, सुनीताताई जाधव, शाहूराव खंडागळे दिगंबर बल्लाळ सुरेश खंडागळे शिवाजी बर्डे नितीन घोरपडे गोरख तुपविहिरे ऑस्टीन गजभिव प्रमोद गजभिव नितीन गुंजाळ लक्ष्मण मोरे सलीम जिलानी पोपटराव सरोदे सरपंच अशोकराव गायकवाड शिवाजीशेठ पवार बाळदेव फुंदे दादासाहेब गाडेकर सुंदर आल्हाट नितीन जाधव बबलू दळवी प्रताप भालेराव परमेश्वर विघ्ने गणेश बोरुडे लक्ष्मण माळी अनिकेत गोसावी संभाजी कुसळकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post