संवाद व स्नेह भोजनातुन कार्यकर्ता आपुलकीचे दर्शन.
- प्रतिनिधी : – नायगाव. नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक अनुषंगाने भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते मा.आ.आदरणीय राम पाटील रातोळीकर साहेबांनी नायगाव विधानसभा, देगलूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधण्यासाठी रातोळी येथील राधामाई निवासस्थानी बैठकीचे आयोजन करुन प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला आणि पदाधिकार्यानी आपले मनोगत व्यक्त केले संघटन वाढीसाठी अहोरात्र मेहणत करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधून स्नेह भोजनाने खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या संवाद बैठकीत कार्यकर्त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठीचा आग्रह पाहता पक्षाने संधी दिल्यास आगामी काळात होणारी पोटनिवडणूक नक्कीच विजयी होईल अशी इच्छा राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केली त्या प्रसंगी धनराज शिरोळे, अशोक पाटील मुगावकर,माणिकराव लोहगावे, निलेश देशमुख बारडकर, शिवराज गाडीवान, शिवसेनेचे शिवाजी पन्नासे, चंद्रशेखर पाटील सावळीकर,अनिल पाटील खानापूरकर, बालाजीराव बच्चेवार, राजेश देशमुख कुंटुरकर, यांनी मनोगत व्यक्त केले निष्ठावंताना पक्षाने संधी दिल्यास नांदेड लोकसभेची जागा विजयी होऊन मोदींजींचे हात बळकट होतील अशी इच्छा कार्यकर्ते यांनी प्रकट केली.





Discussion about this post