कुरुंदवाड/ शहरातील शासनाच्या जागेवर असणाऱ्या झोपडपट्टी नियमितीकरण येणाऱ्या काळात करणार आहे असे आश्वासन शासनाच्या जागेत असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना आमदार यड्रावकर यांनी दिले आहे.
कुरुंदवाड या ठिकाणी गेले 70 ते 80 वर्षापासून अनेक ठिकाणी झोपडपट्टी वसलेली आहे या अद्याप शासनाच्या नियमानुसार नियमित झालेल्या नसल्याने यासंदर्भात झोपडपट्टी धारकांचा मार्गदर्शन मेळावा कुरुंदवाड येथील तबक उद्यान जिम्नॅशियम हॉल येथे झाला.
यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले कुरुंदवाड येथील शासकीय जागेवरील असलेल्या झोपडपट्टीवर कोणतीही आरक्षण नसल्याने झोपडपट्टी नियमितीकरण करणे अवघड नसून याबाबत माहिती मुख्याधिकारी टीना गवळी यांच्याकडून तत्काळ मागविले आहे.
येणाऱ्या काळात या झोपडपट्ट्या नियमितीकरण करून देण्याचे काम माझे आहे. काही दिवसात येथे घर टू घर जागा मोजण्याचे काम चालू होईल व यानंतर झोपडपट्टी नियमित करण्याचे काम होईल. असे आमदार यड्रावकर यांनी सांगितले .
यावेळी माजी नगराध्यक्ष दादासो डांगे, राजू आवळे, जय कडाळे, सुनील कुरुंदवाडे, अक्षय आलासे, अनुप मधाळे, मुख्याधिकारी तथा प्रशासक टीना गवळी तसेच शासकीय जागेवरील झोपडपट्टी धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post