दिनांक-21 सप्टेंबर च्या बंद चा शिराढोण पॅटर्न बनावा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मा. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणास जाहीर पाठिंबा म्हणून आज धाराशिव जिल्हा बंद चे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. त्यास पाठिंबा म्हणून आपल्या शिराढोण बंद ची हाक मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती. परंतु ग्राम दैवत हजरत सय्यद खाजा नसिरुद्दीन साहेब यांचा आलेला उरूस व त्याची होत असलेली जय्यत तयारी, त्यात अडथळा येऊ नये म्हणून मराठा समाजाने सामाजिक बांधिलकी ओळखुन सामाजिक सलोखा राखण्यासाठी बंद चे आयोजन दिवसभर न करता दुपारी 12:00 वाजेपर्यंत करून सामाजिक सलोखा साधून मराठा समाजाने मोठया भावाचे कर्तव्य पार पाडले आहे. व या बंदला इतर समाजानेही पाठिंबा दिला तसेच हा बंद आपल्या गावासाठी शिराढोण पॅटर्न व्हावा. हाच पायंडा भविष्यातील सर्व राजकीय पक्ष, संघटना, व इतर समाज यांनी पाळावा अशीच चर्चा आज दिवसभर सामान्य शिराढोणकर आणि व्यापारी करत होते. जेणे करून उद्देश भी साध्य होईल आणि गावाच्या प्रगतीचा चाक भी चालत राहील.

Discussion about this post