



(बाळराजे पाटील यांचे मोहोळ शहरात शक्ती प्रदर्शन)
मोहोळ तालुका प्रतिनिधी/
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोहोळ तालुक्यात आगमन झाल्यानंतर प्रथम अनगर येथील नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजनेचा शुभारंभ उप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडल्यानंतर बाळराजे पाटील व अजिंक्यराणा
पाटील यांनी आयोजित केलेल्या अनगर ते मोहोळ भव्य अशा रॅली द्वारे मोहोळ बाजार समिती सभा स्थळापर्यंत विविध ठिकाणी अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले, मोहोळ तालुका सकल मराठा समाजाचे निवेदन ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्विकारले.मोहोळ येथील आयोजित सभेला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलताना शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे आदर्श विचार अंगीकारून आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी निघालो आहोत, मोहोळ मध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने बहिणींशी संवाद साधण्याची संधी मिळाली, मोहोळच्या
विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल, राज्य पातळीवर अतिशय लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना विरोधक बंद पाडायला निघाले आहेत, अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या प्रत्येक बहिणींना या योजनेचा लाभ
देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, मुलींसाठी मोफत शिक्षण, 52 लाख कुटुंबांना तीन गॅस सिलिंडर देऊ केले आहेत, शेतकरी बांधवांना वीज बिल माफ केले, दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान. अशा अनेक योजना दिर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील जनतेची भक्कम साथ हवी असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी मजबुती ने उभे
राहण्याची विनंती करतो, माजी आमदार राजन मालक, बाळराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील यांनी विरोधकांच्या टीकाटिप्पणीकडे लक्ष न देता आपले काम करत रहावे हा अजित पवार लोकनेते परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा वादा देतो. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी बाळराजे पाटील यांना राज्याच्या राजकारणात संधी देण्याचे सुतोवाच केले, प्रास्ताविक भाषणात लोकनेते शुगर चे चेअरमन
बाळराजे पाटील यांनी उजनी धरणातून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना फायदेशीर होण्यासाठी सिना नदीवर बोपले व शिरापुर येथे बॅरेज बंधारे , सिना भोगावती जोड कालवा, आष्टी उपसा सिंचन योजना पुर्ण करुन दहा गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली, जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई
चाकणकर, माजी आमदार राजनजी पाटील, आमदार यशवंत माने, लोकनेते शुगर चे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील जेष्ठ नेते कल्याणराव पाटील, कल्याणराव काळे,तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रकाश चवरे यांनी मानले..
Discussion about this post