शहिद ढाकणे यांचे कार्य प्रेरणादायी – १५ मराठा बटालियनचे सुभेदार संदिप कासार
कवि अनंत राऊत यांनी शहिद स्मारक येथे पुष्पचक्र,फुलहार अर्पण
तालुक्यातील विविध गावांमध्ये २४ वा शहिद दिन साजरा
दिंडोरी (नाशिक) प्रतिनिधी:-
तालुक्यातील तळेगाव दिं येथील यशवंत अर्जुन ढाकणे यांनी देशसेवेसाठी बलिदान दिले हि त्यांची प्रेरणा शालेय विद्यार्थी व युवकांनी घेऊन देशसेवा करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन १५ मराठा बटालियनचे सुभेदार संदिप कासार,हवालदार किरण जाधव यांनी केले.
तळेगाव दिं येथील शहिद यशवंत ढाकणे यांचा २४ स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला .त्याप्रसंगी सुभेदार संदिप कासार,हवालदार किरण जाधव बोलत होते.शहिद यशवंत ढाकणे हे देशसेवेसाठी लढतांना सर्वांच्या पुढे जावुन शञुंवर हल्ला चढवत असे यावरून त्यांच्या मनात देशाबददल किती अभिमान असेल आणी हेच भाग्य आपल्या गावाला आणी तालुक्याला लाभले आहे.शहिद यशवंत ढाकणे यांचा आदर्श घेऊन सैन्य दलात भरती व्हावे.असे आवाहन एअर फोर्स अधिकारी पंडितराव खांदवे यांनी केले.यावेळी सुभेदार संदिप कासार यांच्या शुभ हस्ते शहिद यशवंत ढाकणे यांचे स्मारक येथिल ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी शहिद यशवंत ढाकणे यांचे वडील अर्जुन ढाकणे,माता बबुताई ढाकणे,शरद ढाकणे,प्रतिक ढाकणे,बाळासाहेब ढाकणे,यांच्या शुभ हस्ते स्मारकास फुलहार अर्पण करण्यात आला.माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खांदवे, गणपत जाधव,उत्तम बुणगे, अमर निरगुडे,तारकेश्वर भामरे,दत्ता गाडे,शिवाजी हरक,विलोस मोरे,भारत नागरे,शरद नागरे,भिका इचाळे,वैभव भार्गवे,भास्कर खांदवे,रमेश सुर्यवंशी व ईतर माजी सैनिक उपस्थित होते. पोलिस पाटील रोशन परदेशी,तंटामुक्ती समिती अध्यक्ष कांतिलाल घुगे,तलाठी शरद गोसावी,उपसरपंच प्रविण कथार,ग्रा.पं.सदस्य अमोल जाधव, जिजाबाई चारोस्कर,जि.प.प्रा. माॅडेलचे स्कुलचे मुख्याध्यापक धनंजय आहेर,उन्नती विद्यालयाचे मुख्यध्यापक एस.आर.नेरकर,शाळा व्यवस्थापनचे गोविंद ढाकणे,प्रमोद कथार,सहकारी संस्थेचे सचिव एन.ई पवार, माजी उपसरपंच सुदाम ढाकणे,माजी उपसरपंच बाळासाहेब चकोर,माजी उपसरपंच सुरेश कथार,गोकुळ चौधरी, माजी चेअरमन मनोहर कथार,शाम परदेशी,प्रकाश ढाकणे,गोकुळ घुगे, सोसायटीचे माजी चेअरमन दौलत ढाकणे, तालुक्यातील व जिल्ह्यातील सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषद शाळा,उन्नती माध्यमिक विद्यालय यांच्या वतिने शहिद यशवंत ढाकणे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढुन शहिद यशवंत ढाकणे अमर रहे अमर रहे च्या घोषणा दिल्या .यावेळी स्मृतिदिना निमित्त आलेल्या विरमाता शहिद प्रसाद क्षिरसागर यांच्या मातोश्री मंजुषा क्षिरसागर,यांचा सत्कार माजी सैनिक संघटनेच्या वतिने करण्यात आला.यावेळी ईयत्ता १० वी ला प्रथम आलेल्या प्रणाली घुगे यांचा सत्कार माजी सैनिक रमेश सुर्यवंशी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊनसत्कार करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराव पाटील चौधरी यांनी स्मारक सजावटीसाठी फुलहार,पुष्पचक्र, मोठ्या प्रमाणात पाठवले होते.यामुळे शहिद स्मारक हे दिव्य शोभुन दिसत होते. यावेळी रमेश कथार,आनंद घुगे, गोकुळ चौधरी, सागर चकोर,शेखर घुगे, राजेंद्र ढाकणे, प्रतिक ढाकणे ,आनंद ढाकणे,दिगंबर ढाकणे ,ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी सेविका ,शिक्षक शिक्षककेत्त वृंद व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.यावेळी जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व उन्नती विद्यालयातील विद्यार्थी यांना शहिद परिवाराच्या कुटुंबियांकडुन खाऊचे वाटप करण्यात आले.
Discussion about this post