गंगापूर तालुक्यातील आदिवासी समाजाची गोपीचंद पडळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी व अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणी साठी गंगापूर येथील तहसीलदार यांना आदिवासी समाजाचे निवेदन आले.
या आहेत प्रमुख मागण्या
१. अनुसूचित जमाती मध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये
२. गंगापूर व वैजापूर तालुक्यातील आमदारांनी धनगर समाजाला अनुसूचित जमाती (ST) आरक्षण लागू करण्या साठी केलेल्या असंविधानिक माघनीचे निषेद नोंद करण्या बाबत.
३. गंगापूर व वैजापूर तालुक्यातील आदिवासी समजाच्या समशान भूमीच्या जागेचे आपल्या कार्यालय मार्फत तात्काळ पंचनामा करून ७/१२ उतारा वर नोंद करण्या बाबत.
४. गंगापूर व वैजापूर तालुक्यातील आदिवासी समाज राहत असलेल्या गायराण ठिकाणी ८ अ उतारा तात्काळ देपो बाबत.
५. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वर अल्ट्रासिटी अक्ट प्रमाणे गुन्हादाखल करण्यात यावे.
या निवेदनावर सर्व आदिवासी व संघटना यांच्या वतीने तहसील कार्यालय समोर 01/10/2024 मंगळवारी हजारोच्या संख्येने उपस्थित राहून आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शासनाला दिला आहे. यामध्ये नंदू पवार, मच्छिंद्र मोरे, किशोर जोशी, नारायण बर्डे ,सतीश पवार, विक्रम काकडे, ज्ञानेश्वर गोलवाड, भागिनाथ मोरे, भीमराव पवार, हिरालाल पवार, बबन राजपूत
, आदींच्या सह्या आहेत

Discussion about this post