• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल

by
February 14, 2026
in Blog
0
५ हजारांची लाच घेताना डाटा एंट्री ऑपरेटर रंगेहात; तालुका कृषी अधिकाऱ्यासह गुन्हा दाखल
0
SHARES
36
VIEWS
Ad 1

शिरपूर प्रतिनिधी

शासकीय अनुदानासाठी सादर करण्यात आलेली यादी प्रमाणित करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागून स्वीकारताना शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्या माहितीनुसार, सुनिल धनराज पाटील (वय ३१), डाटा एंट्री ऑपरेटर, तालुका कृषी कार्यालय, शिरपूर यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तसेच या मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार (वय ४३) यांनी दुजोरा दिल्याचे निष्पन्न झाले आहे.

तक्रारदार यांचे मौजे बभळाज (ता. शिरपूर) येथे शासनमान्य बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे. Maharashtra State Seeds Corporation मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत गव्हाचे प्रमाणित बियाणे वितरित केले जाते. सन २०२५-२६ मध्ये तक्रारदारांनी ९० शेतकऱ्यांना अनुदानित गव्हाचे बियाणे विक्री केले होते. त्याअनुषंगाने सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह शेतकऱ्यांची यादी दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी तालुका कृषी कार्यालयात सादर करण्यात आली होती.

यादी प्रमाणित करण्यासाठी ५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी सुनिल पाटील यांनी केल्याची तक्रार दि. ११ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. पंचासमक्ष पडताळणीमध्ये लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दि. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी सुनिल पाटील यांनी तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

यानंतर सुनिल पाटील व संजय पवार यांच्याविरुद्ध शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे (पर्यवेक्षण अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल (सापळा अधिकारी) व पथकातील अधिकारी-कर्मचारी यांनी केली.

या पथकात पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील, प्रितेश चौधरी, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे आदींचा समावेश होता. सदर कारवाईस Bharat Tangde (पोलीस अधीक्षक), माधव रेडी (अपर पोलीस अधीक्षक) व सुनिल दोरगे (अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र) यांचे मार्गदर्शन लाभले.

पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

उंबरठाण महाविद्यालयात सांस्कृतिक स्पर्धांचा उत्फुर्त समारोप

Next Post

धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
65
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
52
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post
धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?

धनादेशावर बनावट स्वाक्षरीने २.१९ लाखांचा विड्राॅल?

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In