• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 17, 2026
in Blog
0
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

महिला, लहान मुले आणि जनावरांचाही सहभाग; पाणीटंचाईचे भीषण वास्तव जिल्हाधिकारी कार्यालयात मांडले

श्रीगोंदा | प्रतिनिधी

महांडूळवाडी (ता. श्रीगोंदा) येथील पाणीटंचाई आणि पाझर तलावांवरील अतिक्रमणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा काढला. या मोर्चात गावातील महिला रिकामे हांडे घेऊन सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे, गावातील पाणीटंचाईची भीषणता प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लहान मुले आणि जनावरांनाही मोर्चात सहभागी करण्यात आले. या अनोख्या आंदोलनातून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.

RelatedPosts

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

महांडूळवाडी येथील पाझर तलावांची शासकीय मोजणी करून तलावांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यासाठी प्रशासनाला वारंवार लेखी निवेदनेही देण्यात आली आहेत. प्रशासनाने दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी शासकीय मोजणीचे नियोजन केले होते. मात्र, निश्चित केलेल्या दिवशी प्रत्यक्ष मोजणी न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

एकीकडे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई, दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सार्वजनिक जलस्रोतांवरील अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी रिकामे हांडे घेऊन, लहान मुले आणि जनावरांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

१. महांडूळवाडी येथील सर्व पाझर तलावांची नियोजित शासकीय मोजणी तातडीने पूर्ण करावी.

२. पाझर तलावांवरील अतिक्रमणांची निश्चिती करून कायदेशीर प्रक्रियेनुसार ती तातडीने हटवावीत.

३. अतिक्रमणधारकांना पाठीशी घालून शासकीय मोजणी व अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीत अडथळे निर्माण करणाऱ्या संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी.

४. शासकीय मोजणी व अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण कार्यवाही पारदर्शकपणे पूर्ण करावी.

दि. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रस्तावित असलेली पाझर तलावांची शासकीय मोजणी आणि त्यानंतर अतिक्रमणांवर होणारी कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांचे उपोषण सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. केवळ आश्वासने किंवा नवीन तारीख देऊन ग्रामस्थांची दिशाभूल करू नये. प्रत्यक्ष शासकीय मोजणी करून अतिक्रमणे हटविण्याची ठोस कार्यवाही झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

गावातील महिलांना रिकामे हांडे घेऊन, लहान मुलांना आणि मुक्या जनावरांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागणे ही प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. वारंवार लेखी निवेदने देऊनही प्रश्न सुटत नसेल, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कोणाकडे, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला.

महांडूळवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांना पावन फाउंडेशन व संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. ग्रामस्थांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत पाझर तलावांची शासकीय मोजणी आणि अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पूर्ण होईपर्यंत या लढ्याला सहकार्य करण्याची भूमिका यावेळी मांडण्यात आली.

यावेळी इंजि. शामभाऊ जरे (जिल्हा संपर्कप्रमुख), प्रफुल्ल उर्फ बापू जगताप (तालुका कार्याध्यक्ष), पांडुरंग खोरे (तालुका उपाध्यक्ष), घनशाम काळे (तालुकाध्यक्ष, कामगार आघाडी) आणि संतोष आरडे (तालुका संघटक) उपस्थित होते.

आंदोलनात सहभागी ग्रामस्थ

महिला व युवती : वैशाली आनंद दरेकर, पुनम दत्तात्रय महांडुळे, वर्षा रवींद्र महांडुळे, मंगल शंकर देवकर, सुवर्णा संजय देवकर, अर्चना गणेश मंडळे, शितल अक्षय दरेकर, वर्षा केशव महांडुळे, सिंधू लहानू महांडुळे, रूपाली भरत घोगरे, रोहिणी गणेश घोगरे, जया भाऊसाहेब महांडुळे, नंदाबाई नाना महांडुळे, छाया रोहिदास महांडुळे, स्वाती सुभाष महांडुळे, मंगल महांडुळे, हौसाबाई रामदास देवकर, आनंदा अमृता दरेकर, ऐश्वर्या अक्षय दरेकर.

पुरुष व युवक : शंकर देवकर, रवींद्र राजाराम महांडुळे, प्रकाश ज्ञानदेव घोगरे, दत्तात्रय बाळकृष्ण महांडुळे, उत्तम ज्ञानदेव घोगरे, गणेश देवकर, अतुल लोखंडे, अजय पवार, मारुती घोगरे, पोपट महांडुळे, संजय देवकर, छगन देवकर, बजरंग धनवट, गोरख गुंजाळ, संदीप महांडुळे, गणेश घोगरे, सुभाष महांडुळे, रोहिदास महांडुळे, एकनाथ महांडुळे, अक्षय दरेकर, विनायक घोगरे, नवनाथ देवकर, राम महांडुळे, पोपट बबन महांडुळे, संतोष देवकर, रामदास महांडुळे, भागवत महांडुळे, भाऊ नामदेव महांडुळे, केशव महांडुळे, युवराज बाळकृष्ण बापू धनवट महांडुळे, उत्तम रामदास देवकर, शिवम महांडुळे, सार्थक मांडोळे, सिद्धार्थ महांडुळे, हरिचंद्र धनवट, ज्ञानदेव घोगरे, ओमकार दरेकर, व्यंकटेश आनंदा दरेकर, ओम तात्यासाहेब दरेकर, अजय धनवट, युवराज बाळकृष्ण महांडुळे.

“पाणी हा आमचा हक्क आहे, उपकार नाही!”

महांडूळवाडीच्या पाणीप्रश्नाला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.

Ad 1
Previous Post

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

Next Post

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

Related Posts

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित
Blog

प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांना राज्यस्तरीय ‘आस्था-दीप’ पुरस्काराने सन्मानित

November 16, 2026
6
सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
Blog

सावंगा जहागीर येथे क्रांतिसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

November 16, 2026
11
चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’
Blog

चिचोंडी पाटीलच्या जिल्हा परिषद शाळेत रंगली ‘आकाशगंगेची सफर’

November 16, 2026
7
खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा
Blog

खेळाडूंच्या भविष्याशी खेळू नका! १४ व १७ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडूंचे ५ टक्के क्रीडा आरक्षण कायम ठेवा

November 16, 2026
10
आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा
Blog

आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून पेणटाकळी प्रकल्पांतर्गत सिमेंट (टर्फ) कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व आढावा

November 16, 2026
3
अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन
Blog

अकोळनेर येथे ‘दृष्टीदा आयुर्वेदिक नेत्र रुग्णालय व संशोधन केंद्रा’चे उद्घाटन

November 16, 2026
3
Next Post
कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

कुकडी डाव्या कालव्यावरील पाणीचोरीला दणका; ५०० अनधिकृत पाईप हटवले, ११ जणांवर गुन्हे दाखल

November 17, 2026
महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

महांडूळवाडी ग्रामस्थांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर हांडा मोर्चा!

November 17, 2026
मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

मराठवाड्यातील कोळी महादेव, मल्हार कोळी व टोकरे कोळी जमातींच्या विकासासाठी श्वेतपत्रिका जाहीर करा

November 17, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In