• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

by
February 17, 2026
in ताज्या घडामोडी, राजकारण, राजकीय
0
नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
0
SHARES
11
VIEWS
Ad 1

नाशिक जिल्हा प्रतिनिधी – योगेश बोचरे (७३०४६१२८७९)

नाशिक: मालेगाव प्रमाणेच नाशिकमध्येही बोगस जन्म दाखल्यांचा घोटाळा झाला असून, असे तब्बल १८ हजार जन्म दाखले देण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी महापौरांसह महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधीक्षकांकडे केल्याचे सोमय्या यांनी सांगितले. राज्यात वर्षभरात २ लाख ३३ हजार जन्मप्रमाणपत्र नोंदी रद्द करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच नाशिक महापालिका क्षेत्रातही बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्मप्रमाणपत्रे देण्यात आल्याचा संशय असल्यामुळे सोमय्या यांनी सोमवारी (दि. १६) महापौर हिमगौरी आहेर-आडके यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, पोलिस अधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा केल्यानंतर नाशिकमध्येही जन्मप्रमाण पत्र नोंदणीत घोटाळा झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. शेख नायरा नूर मोहम्मद यांचा बोगस जन्मदाखला पुराव्यानिशी सादर केला असून, त्याची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
मालेगावमध्ये तीन हजार ९७७ खोटे जन्मदाखले असून, त्याप्रकरणी चार गुन्हे दाखल केल्याचे सांगतानाच एक हजार लोकांना आरोपी केल्याचा दावाही सोमय्या यांनी केला. कुठलाही बांगलादेश रोहिंग्या, अफगाणिस्तानच्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार नाही, असेही ते म्हणाले. आपण महिनाभरात २५ महापालिकांना भेटणार असल्याचे सोमय्या या वेळी म्हणाले.
तत्काळ चौकशी करुन आठ दिवसांत अहवाल
महापालिकेच्या सातपूर विभागीय कार्यालयातून बनावट जन्म दाखल्याप्रकरणी तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली. सातपूर विभागीय कार्यालयातून एका महिलेला बनावट जन्म दाखला दिल्याचा आरोप केल्यानंतर महापालिकेकडूनही चौकशी सुरू केल्याचे हिमगौरी आहेर-आडके यांनी सांगितले. यासदंर्भात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. चौकशीत दोषी आढळल्यास जन्म-मृत्यू दाखला देणारे कर्मचारी व दाखल्यावर स्वाक्षरी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले
पत्रकारांवरच चीडचीड
मुबंई रेल्वे स्टेशनजवळ ८० टक्के फेरीवाले बांगलादेशी, मुस्लिम माफिया आहेत, तर त्यावर गृहविभागाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे समर्पक उत्तर नसल्याने आपला काही ‘वन पॉइंट प्रोग्राम’ आहे का, असा प्रश्न विचारत त्यांनी पत्रकारांशीच हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. ११ वर्षांत कित बांगलादेशींना देशाबाहेर काढले, हे विचारल्यानंतर सोमय्यांची चीडचीड वाढली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय देणे हा परराष्ट्र धोरणाचा भाग असल्याचा दावा केला. आपल्याला टार्गेट केले जात असल्याचे सांगत, त्यांनी पत्रकार परिषद गुंडाळली.

RelatedPosts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

Tags: Bharat pagareKailas GharatManik BansodeMore VishalNilkanth VasuShailesh MotghareShambhonath RanshetreSheikh AnisShrikant DhokteVicky Jadhav
Previous Post

युवा पत्रकार केशव गरकळ यांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती प्रेरणा पुरस्काराने गौरव

Next Post

नियोजनबध्द  अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो – संजय साबळे

Related Posts

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा
ताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांसाठी एसटी बस थांब्याची मागणी; ७ ऑक्टोबरला रास्ता रोकोचा इशारा

October 4, 2026
12
नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
ताज्या घडामोडी

नैताला गाव ७० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित

October 4, 2026
15
लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर
ताज्या घडामोडी

लासलगाव ग्रामीण रुग्णालयात ६ ऑक्टोबरला मोफत कॅन्सर तपासणी शिबिर

October 4, 2026
20
तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

तालुक्यात प्रथम येऊनही शिंदेवाडी शाळेला ‘IDEAL Center’पासून वंचित ठेवल्याचा ग्रामस्थांचा आरोप

October 3, 2026
70
ताज्या घडामोडी

गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली?

October 3, 2026
18
ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न
ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत कर्मचारी संघटना AMT 02 ची नांदुरा तालुक्यात आढावा बैठक संपन्न

October 3, 2026
59
Next Post
नियोजनबध्द  अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो – संजय साबळे

नियोजनबध्द  अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो - संजय साबळे

ताज्या बातम्या

हर्दखळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; BDO अधिकाऱ्यांना पाठिशी घालत आहेत का?

October 4, 2026
मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी प्रशासन मैदानात!

October 4, 2026
अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

अर्जुन तात्या भंडारा उत्सव उत्साहात साजरा

October 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In