• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नियोजनबध्द  अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो – संजय साबळे

by
February 17, 2026
in Blog
0
नियोजनबध्द  अभ्यासातूनच यशाचा मार्ग निघतो – संजय साबळे
0
SHARES
32
VIEWS
Ad 1

दुंडगे माध्यमिक विद्यालय येथे दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात

दुंडगे (प्रतिनिधी):
“परीक्षा केवळ यश-अपयशाचे मोजमाप नसून वर्षभर केलेल्या प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचा तो महत्त्वाचा टप्पा असतो. नियमितपणे, नियोजनबद्ध पद्धतीने केलेले कष्ट विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवतात. योजनाबद्ध अभ्यासातून केवळ यशच नव्हे तर आत्मविश्वासही प्राप्त होतो,” असे प्रेरणादायी प्रतिपादन ज्येष्ठ मार्गदर्शक संजय साबळे यांनी केले.
ते दुंडगे माध्यमिक विद्यालय येथे आयोजित इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या सदिच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. जे. पाटील होते.
प्रास्ताविक करताना डी. डी. होणगेकर यांनी दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा असल्याचे सांगत सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पुढे मार्गदर्शन करताना संजय साबळे म्हणाले,
“आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय करू शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य असे काहीही नाही. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला पर्याय नाही. आणि कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो.”

RelatedPosts

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती


दहावीचे वर्गशिक्षक एन. टी. बेनके यांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, शिस्त आणि चिकाटी यांच्या जोरावर उत्तुंग यश संपादन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना शाळेतील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींचा सहवास यांचा उल्लेख केला.
गजेंद्र कांबळे, सुजल पाटील, सुबोध खन्नुरकर, श्वेता नौकुडकर, पुनम खन्नुरकर, शर्वरी गवेकर, संस्कृती गवेकर, अनुष्का खनुरकर, समृद्धी कोकितकर आणि भक्ती कन्नूरकर या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. टी. एस. पी. नंद्याळकर यांनी प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन वाय. बी. पाटील यांनी मांडले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्या स्वप्नांची चमक आणि भविष्यासाठीचा आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येत होता. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्यपूर्ण कष्ट आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर दहावीचे विद्यार्थी निश्चितच यशस्वी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Previous Post

नाशिकमध्ये 18 हजार जन्मदाखले बनावट; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Next Post

मित्रांनी मिळून साजरा केला अनोखा वाढदिवस

Related Posts

Blog

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026
8
Blog

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
5
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती
Blog

वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची तातडीने दुरुस्ती

September 27, 2026
2
कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद
Blog

कांदिवली गावठाणातील यंग स्टार क्रीडा मंडळाचे विसर्जन कार्य कौतुकास्पद

September 27, 2026
5
कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया
Blog

कांदिवलीतील लालजी पाडा येथे पाण्याची पाइपलाइन फुटली; लाखो लिटर पाणी वाया

September 27, 2026
1
Blog

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळाची पहिली कळ; विविध सवलती लागू

September 27, 2026
2
Next Post

मित्रांनी मिळून साजरा केला अनोखा वाढदिवस

ताज्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप

September 27, 2026

बेलापूरमध्ये थरारक अपघात; मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल

September 27, 2026
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत

September 27, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In