प्रतिनिधी वार्ताहर
अमोल कदम
राज्यभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवजयंती निमित्त पानचिंचोली येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला येथील विद्यार्थिनींना शालेय साहित्याचे वाटप करत शिवजयंती साजरी करण्यात आली. या साहित्यामध्ये वही पेन यासह इतर साहित्यांचा समावेश करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती झाल्यानंतर विद्यार्थी व गावकरी मिळून मोठ्या जयघोषात शिवजयंती साजरी करण्यात आली यानंतर सुदर्शन जाधव पण चिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच बब्रुवान जाधव माजी सरपंच श्रीकांत साळुंखे काकासाहेब पाटील या ग्रामस्थासह शिवजयंती समिति अध्यक्ष अनिकेत जाधव उपाध्यक्ष शुभम जाधव सचिव उमेश ढेले जाधव अजित जाधव नागेश जाधव कृष्णा कदम शुभम दिवे मुकेश दिवे यासोबतच समस्त ग्रामस्थांनी आपली उपस्थिती दर्शवली




