• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

६,००,०००/- रुपयांच्या अपहार प्रकरणी एक आरोपी अटकेत; संगनमताने बनावट चोरीचा बनाव उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…

by
February 20, 2026
in Blog
0
६,००,०००/- रुपयांच्या अपहार प्रकरणी एक आरोपी अटकेत; संगनमताने बनावट चोरीचा बनाव उघड. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई…
0
SHARES
46
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी –

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे गु.र.नं. ५३/२०२६ कलम ३०३ (२) भा.न्या.सं. अन्वये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावला असून ५,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दाखल नमूद गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक करण्यासंदर्भात पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेत होते.
दरम्यान दि. ०८/०२/२०२६ रोजी सायंकाळी पथकाने पो.स्टे. शिवाजीनगर, लातूर येथे दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे १) जावेद जलील शेख (वय २७ वर्षे, रा. बिलाल मजीद जवळ, इस्लामपुरा, लातूर) यास खोरी गल्ली परिसरातून त्यास ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. तो गेल्या अकरा वर्षांपासून टिळक नगर, लातूर येथील एका डायग्नोस्टिक सेंटर मध्ये एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. सदर ठिकाणी ग्राहकांकडून जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यात येत होती. ही रक्कम काही वेळा आरोपी जावेद शेख व त्याचा सहकारी अर्शद शेख यांच्या ताब्यात दिली जात असे. ही बाब जावेद शेख ने त्याचा मित्र आकाश ढगे यास सांगितली. दोघांनी संगनमताने अर्शद शेख यांच्या अक्सेस स्कूटरची बनावट चावी तयार करून स्कूटरच्या डिक्कीत ठेवलेली रक्कम चोरी करण्याचा कट रचला.
सुमारे महिनाभरापूर्वी बनावट चावी तयार करून ती जावेद शेख ने आकाश ढगे याच्याकडे दिली.

RelatedPosts

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

दि. ०५/०२/२०२६ रोजी संबंधित डायग्नोस्टिक सेंटर ने जावेद शेख कडे ९०,०००/- रुपये व अर्शद शेख याच्याकडे ६,००,०००/- रुपये बँकेत भरण्यासाठी देण्यात आले होते. दोघांनीही संबंधित रक्कम आपल्या-आपल्या स्कूटरच्या डिक्कीत ठेवली. त्यानंतर एका चहाच्या स्टॉलसमोर गाड्या उभ्या करून चहा पिण्यासाठी थांबले असता जावेद शेखने आकाश ढगे फोनवर माहिती दिली. काही वेळाने अर्शद शेख यांची स्कूटर तेथून गायब झाली. नंतर ती स्कूटर हायटेक सेंटर समोरील बोळात आढळून आली; मात्र डिक्कीतील ६,००,०००/- रुपये रोख रक्कम गायब असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दि. ०८/०२/२०२६ रोजी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली होती.
तपासादरम्यान आरोपी जावेद जलील शेख व त्याचा साथीदार आकाश ढगे यांनी संगनमताने बनावट चावी तयार करून चोरीचा बनाव रचून सदर ६,००,०००/- रुपये अपहार केल्याचे निष्पन्न झाले. निष्पन्न आरोपी जावेद जलील शेख यास पुढील तपास कमी पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे हजर करण्यात आले होते परंतु चोरीची रक्कम फरार आरोपी आकाश ढगे यांच्या ताब्यात असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध मोहीम राबवून मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मौजे जोडजवळा, ता. जि. लातूर येथे सापळा रचून आरोपी आकाश प्रकाश ढगे (वय ३० वर्षे, रा. जोडजवळा, ता. जि. लातूर, सध्या रा. लेबर कॉलनी, लातूर) यास ताब्यात घेतले. सखोल चौकशीत आरोपीने त्याचा साथीदार जावेद जलील शेख (वय २७ वर्षे, रा. बिलाल मशीद जवळ, इस्लामपुरा, लातूर) याच्यासह मिळून चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील ६ लाख रुपयांपैकी ५० हजार रुपये खर्च केल्याचे सांगितले असून उर्वरित ५,५०,०००/- रुपये आरोपीने जोडजवळा येथील भावाच्या घरात लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. यावरून ५,५०,०००/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
आरोपी नामे
१) जावेद शेख यास दिनांक ०८/०२/२०२६ रोजी खोरी गल्ली येथून तर २) आकाश ढगे याला दिनांक १७/०२/२०२६ रोजी जोडजवळा येथून स्थानिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहे. असून पुढील तपास पोलीस स्टेशन शिवाजीनगर, लातूर येथे सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, राजेश घाडगे, सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, प्रदीप स्वामी, जमीर शेख, सुरेखा मदने, श्रीनिवास जांभळे , राहुल कांबळे यांनी केली आहे.

Previous Post

नवी मुंबईतील कोपरखैराणे सेक्टर ७ मध्ये महिलांची अनोखी शिवजयंती

Next Post

सोलापूर शहर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष Manish Ket यांची सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड

Related Posts

Blog

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

June 16, 2026
3
Blog

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

June 16, 2026
0
Blog

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

June 16, 2026
0
Blog

रामनगर फ्री-होल्डधारकांना तातडीने मालकी हक्काची पत्रके वितरीत करा – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

June 16, 2026
0
Blog

देवळी मतदारसंघातील समस्यांची सोडवणूक करून जनतेला न्याय देणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

June 16, 2026
1
Blog

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्रमशक्ती व असंघटित क्षेत्र सर्वेक्षणाचा शुभारंभ

June 16, 2026
0
Next Post

सोलापूर शहर:-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष Manish Ket यांची सोलापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड

ताज्या बातम्या

दारू मालाची वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

June 16, 2026

दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या दोन वाहनचालकांवर कारवाई; दोन दुचाकी जप्त

June 16, 2026

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

June 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In