• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नवनिर्वाचित कोळपे जि.प. सदस्य प्रमोदजी रावराणे व पं.स. सदस्या सुवर्णा संसारे यांचा वेंगसर येथे सत्कार सोहळा संपन्न

by
February 21, 2026
in Blog
0
नवनिर्वाचित कोळपे जि.प. सदस्य प्रमोदजी रावराणे व पं.स. सदस्या सुवर्णा संसारे यांचा वेंगसर येथे सत्कार सोहळा संपन्न
0
SHARES
53
VIEWS
Ad 1

वेंगसर पंचशील नगरीतील समाज मंदिर येथे वेंगसर बौद्ध विकास मंडळ मुंबई (रजि.) ग्रामीण, माता रमाई महिला मंडळ वेंगसर तसेच सम्यक युवा कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने नवनिर्वाचित कोळपे जिल्हा परिषद सदस्य प्रमोदजी रावराणे व तिथवली पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा संसारे (मा. सभापती) यांचा भव्य सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, गौतम बुद्ध तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून करण्यात आली. शिवजयंतीचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमास ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

RelatedPosts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले प्रमोदजी रावराणे यांचा वेंगसर बौद्ध विकास मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार गुणाजी पांडुरंग कांबळे व सुभाष कांबळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तिथवली पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा संसारे यांचा माता रमाई महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना प्रमोदजी रावराणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला “शिका, संघटित व्हा” हा संदेश अधोरेखित करत सर्व बौद्ध बांधवांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. संघटितपणातूनच सर्वांगीण विकास शक्य असून मतदारसंघ तंटामुक्त करण्याचे आपले स्वप्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई (रजि.) मंडळ व ग्रामीण मंडळाच्या वतीने नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमाला वैभववाडी तालुका माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा व माजी समाजकल्याण सभापती (सिंधुदुर्ग) सौ. शारदा कांबळे, सुभाष कांबळे (संविधान सैनिक संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष), गोविंद कांबळे, सौ. साक्षी कांबळे (मा. सरपंच), समाधान गुरव (मा. उपसरपंच), विलास पावसकर (मा. ग्रा.पं. सदस्य), संदीप नार्वेकर (तंटामुक्त अध्यक्ष), आत्माराम गोठणकर, रमेश बंदरकर, सुभाष घाडी, आनंद शिंदे, महेंद्र रांबाडे, मनोहर फोंडके, महेश संसारे तसेच महिला मंडळाच्या कार्यकर्त्या सौ. सुनयना कोटकर, सौ. स्नेहलता जाधव, सौ. सुमन कोटकर, सौ. पुनम कांबळे, सौ. सुनिता कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहित जाधव, सार्थक जाधव, सक्षम पुरळकर, अक्षय जाधव, सुरज जाधव, संदेश कांबळे, कु. ऋतूजा कांबळे, कु. सान्वी कांबळे या युवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष कांबळे यांनी केले.

सामाजिक एकजूट आणि प्रेरणादायी संदेशांनी परिपूर्ण असा हा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला.

Previous Post

सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी…

Next Post

सोलापुरातील होटगी रोड येथील इंडस्ट्रियल इस्टेट सोसायटीमध्ये 24 फेब्रुवारी रोजी होणार उद्योग योजनांच्या माहितीसाठी कार्यशाळा..

Related Posts

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
5
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…
Blog

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
46
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई
Blog

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026
50
Blog

सभासदांच्या सहकार्या ने संस्था प्रगतीपथावर.. . मात्र सभेत वाद – विवाद… .

September 13, 2026
31
नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती
Blog

नाशिक जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील ‘भैय्या’ आहिरे यांची नियुक्ती

September 13, 2026
73
Blog

आपल्या पंचकोशी मधील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय सन्माननीय संत सज्जन गुरुजन यांस सस्नेह नमस्कार.

September 13, 2026
14
Next Post

सोलापुरातील होटगी रोड येथील इंडस्ट्रियल इस्टेट सोसायटीमध्ये 24 फेब्रुवारी रोजी होणार उद्योग योजनांच्या माहितीसाठी कार्यशाळा..

ताज्या बातम्या

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

न्यायालय आणि पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच मिरवणुका काढाव्यात :माजी नगराध्यक्ष डांगे…

September 13, 2026
क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

क्रांती चौकात हेल्मेट सक्तीचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई

September 13, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In