• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

कळंबोली मध्ये पाणीपुरवठा ठप्प! सिडकोच्या हलगर्जीपणावर संताप..स्त्रीशक्ती फाउंडेशनचा आक्रमक पवित्रा…

by
February 22, 2026
in Blog
0
कळंबोली मध्ये पाणीपुरवठा ठप्प! सिडकोच्या हलगर्जीपणावर संताप..स्त्रीशक्ती फाउंडेशनचा आक्रमक पवित्रा…
0
SHARES
113
VIEWS
Ad 1

पनवेल – कळंबोली ता. प्रतिनिधी :
पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोली येथील सेक्टर 4ई परिसरातील केएल–४ भागात १५ फेब्रुवारीपासून पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प असून शेकडो कुटुंबांवर अक्षरशः पाणीबाणी ओढवली आहे. नळ कोरडे, टाक्या रिकाम्या आणि घराघरांत पाण्याच्या डब्यांच्या रांगा अशी भीषण स्थिती गेल्या आठ दिवसांपासून कायम आहे. वारंवार तक्रारी करूनही सिडको प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना घरात पाणी नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि आरोग्यावर परिणाम होत आहे. महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचे हाल होत आहेत.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका विजया कदम यांनी थेट सिडकोच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत आक्रमक भूमिका घेतली. “१५ फेब्रुवारीपासून केएल–४ मध्ये पाणी नाही, तरी प्रशासन झोपेत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच सिडकोने जलवाहिन्यांमध्ये अडथळा शोधण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे समजते.

RelatedPosts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

केएल–४ परिसरातील कंपाउंड 17 ते 24 आणि 25 ते 32 या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. जलवाहिन्यांमध्ये काथ्या अडकल्यामुळे अडथळा निर्माण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी इतके दिवस तो शोधण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
दररोज सकाळ-संध्याकाळ पाण्याच्या प्रतीक्षेत नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. काहींनी खासगी टँकरवर अवलंबून राहण्यास सुरुवात केली आहे; मात्र त्याचा आर्थिक भार सर्वसामान्यांवर पडत आहे. दूषित पाण्याचा प्रश्न यापूर्वीही वारंवार समोर आला होता. तरीही सिडकोकडून कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिक महिलांनी आपली व्यथा स्त्रीशक्ती फाउंडेशनकडे मांडल्यानंतर विजया कदम यांनी तात्काळ सिडको पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांशी संपर्क साधला. “बोर्डाच्या परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागणे ही प्रशासनाची गंभीर चूक आहे. याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सिडकोकडून ठिकठिकाणी खोदकाम सुरू करण्यात आले असून जलवाहिन्यांमधील अडथळा शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तोपर्यंत संबंधित भागाला तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी स्त्रीशक्ती फाउंडेशनने केली आहे.
याप्रकरणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची ग्वाही विजया कदम यांनी दिली आहे.

Previous Post

रिसोड–साखरा रस्त्याची दुरवस्था; नागरिक त्रस्त, ‘शोले’ पद्धतीने आंदोलनाचा इशारा

Next Post

जत येथील एसआर. व्ही.एम.प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी…

Related Posts

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
6
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
63
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
45
नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…
Blog

नागेश्वराच्या पावनभूमीत नागपंचमी निमित्त रंगणार कुस्त्यांचा थरार…

August 17, 2026
23
Next Post

जत येथील एसआर. व्ही.एम.प्रशालेत शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी...

ताज्या बातम्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In