• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू; साडेतीन लाखांचे नुकसान

by
February 23, 2026
in Blog
0
विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू; साडेतीन लाखांचे नुकसान
0
SHARES
51
VIEWS
Ad 1

📍 लांझी-हिरापूर, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लांझी-हिरापूर येथे विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे दोन कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा मुख्य आधार हरपला असून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

RelatedPosts

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

मिळालेल्या माहितीनुसार, एक म्हैस अनिल गवळी यांच्या मालकीची तर दोन म्हशी सोमनाथ रामदास पवार यांच्या मालकीच्या होत्या. दुग्ध व्यवसायावर कुटुंबाचा खर्च भागवणाऱ्या या शेतकऱ्यांवर अचानक मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. पशुधन हाच ग्रामीण भागातील कुटुंबांचा आधार असल्याने या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच महसूल अधिकारी भगवान खांडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच उपसरपंच योगेश आरगडे, माजी ग्रामपंचायत सदस्य रवि मनगटे, नंदू सोनवणे, बाबासाहेब आरगडे, सचिन जमधडे व अक्षय भवर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती घेत महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामा प्रक्रिया जलद पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला.

ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त करत शासनाकडे तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. “ग्रामीण भागात पशुधन हेच कुटुंबाचे बळ असते. एका क्षणात तीन म्हशी दगावल्याने या कुटुंबांवर मोठे संकट आले आहे,” असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

पीडित शेतकऱ्यांनीही प्रशासनाकडे मदतीची याचना करत, “आमचा उदरनिर्वाह पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. भरपाई मिळाल्यास आम्हाला मोठा आधार मिळेल,” अशी व्यथा मांडली.

दरम्यान, या घटनेनंतर परिसरात वीज पुरवठा यंत्रणेची तपासणी करून सुरक्षितता उपाययोजना अधिक कडक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्थानिक नेतृत्वाने “गावातील कोणतेही कुटुंब संकटात असताना आम्ही त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहू,” असे आश्वासन देत शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे सांगितले. त्यांच्या या संवेदनशील भूमिकेमुळे पीडित कुटुंबांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Source: JAKIR A.shaha
Via: जाकिर ए शाहा
Tags: Shah Ayyaub
Previous Post

माहितीच्या बदल्यात फोनपे वर हजारो रुपये? – हर्षवर्धन जाधव

Next Post

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

Related Posts

Blog

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
1
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
7
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही
Blog

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026
14
Blog

जामखेडची पंचमी अन् घुंगराचा आवाज…

August 17, 2026
35
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

August 17, 2026
66
ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम
Blog

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा जागतिक विश्वविक्रम

August 17, 2026
53
Next Post

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

ताज्या बातम्या

सैनिक संघटनेचा अनोखा उपक्रम; विद्यार्थिनींकडून सीमेवरील सैनिकांना राख्या

August 20, 2026
संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

संत निरंकारी मिशन च्या संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन (दिल्ली) शाखा सिडको छत्रपती संभाजीनगर तर्फे आयोजित रक्तदान शिबिरात716 दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 17, 2026
स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

स्वातंत्र्यदिनी महावितरण, आरोग्य उपकेंद्राच्या शासकीय इमारतींवर राष्ट्रध्वज फडकला नाही

August 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In