• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

by
February 22, 2026
in Blog
0
0
SHARES
13
VIEWS
Ad 1

– फेब्रुवारी २२, २०२६

चिखला काकड :: छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण

RelatedPosts

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

नेत्याच्या विखारी भूमिकेमुळे शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुखांचा राजीनामा

सिंदखेडराजा:- सारथी महाराष्ट्राचा (गणेश सांगळे )नजीकच्या चिखला काकड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणी माजी आमदार यांच्या भूमिकेला लक्ष करीत शिवसेना शिंदे गटाच्या महिला आघाडी तालुका प्रमुख असलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सरळसरळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविला आहे. या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासंदर्भात चिखला काकड, ता. लोणार येथील प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या जातीयवादी विखारी भूमिकेमुळे अस्वस्थ झाल्याचे राजीनामा पत्रात विदित करीत सौ. जयश्री दीपक कायंदे यांनी राजीनामा मंजूर करुन आपला श्वास मोकळा करण्याचे राजीनामा पत्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठविले आहे.

ह्या राजीनामा पत्रात पुढे म्हटले आहे की, शिवसेनेचे संस्थापक माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रवाहित करण्याचे काम शिवसेनेतील नेते, पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मिळून केले पाहिजे.

परंतु शिवसेनेचे नेते व सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी वंजारी समाजाला लक्ष्य (टारगेट) केले आहे. त्यामागे चिखला काकड येथील घटनेची कुठलीही शहानिशा केली नाही. कोणत्याही प्रकारची न्याय भूमिका ठेवली नाही, तर मनात आकसभाव सरळसरळ एक बाजू लावून धरली आहे.

सौ. जयश्री दीपक कायंदे ह्या ज्या समाजातून येतात त्याबद्दल तिरस्काराची भूमिका ठेवली आहे, असा आरोप पत्रात आहे.

अशा व्यक्तींच्या नेतृत्वाखाली काम करणे नक्कीच चुकीचे आहे.

ह्या सगळ्या प्रकरणामुळे व सामाजिक भावनेचा आदर करीत आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्रात शेवटी नमूद केले आहे. तर माझा राजीनामा मंजूर करुन आपल्याला श्वास मोकळा करुन देण्यात यावा अशी विनंती देखील करण्यात आली आहे.

मागील काळात अनेक प्रलोभने धुडकावून लावत,  शिवसेना व नेते तथा माजी आमदार डॉ. यांच्याशी कायमस्वरुपी एकनिष्ठ राहिलेल्या सौ. जयश्री दीपक कायंदे ह्यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय, सामाजिक आदि क्षेत्रात खळबळ उडाली आहे, एवढे मात्र निश्चित ..!

Previous Post

विजेचा धक्का लागून तीन म्हशींचा दुर्दैवी मृत्यू; साडेतीन लाखांचे नुकसान

Next Post

आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !

Related Posts

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
4
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
167
रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी
Blog

रावल बी.एड. महाविद्यालयात महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी

October 5, 2026
8
दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर
Blog

दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी; पालकमंत्री विखे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर

October 5, 2026
39
सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा
Blog

सुकोडा फाटा-पाच मोरी परिसरातील हातपंप तातडीने दुरुस्त करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

October 5, 2026
21
मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली
Blog

मेढा-महाबळेश्वर रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्याच्या हालचाली

October 5, 2026
5
Next Post
आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !

आलेगाव येथील क्रिकेट सामन्यांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूची धडाकेबाज फलंदाजी !

ताज्या बातम्या

सेलू पोलिसांची १२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन आरोपींना अटक, १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 5, 2026
कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

कराटे स्पर्धेत हिंगणीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड

October 5, 2026
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In