गेवराई(सारथी महाराष्ट्राचा): गेवराईहून बिडकडे मेंढ्या-शेळ्या घेऊन येणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. या आगे मध्ये 30 पेक्षा जास्त शेळ्या मेंढ्या जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मध्यरात्री बारा वाजण्याच्या दरम्यान पाडळसिंगी च्या टोलनाक्याजवळ घडली. ट्रकला आग लागल्यानंतर अनेकांनी घटनास्थळी धाव घेऊन आतील काही शेळ्यांना व मेंढ्यांना बाहेर काढल्याने त्या वाचू शकल्या. यात ट्रकचेही मोठे नुकसान झाले.
Discussion about this post