
- पांढरकवडा नगर परिषद प्रशासनाच्या निष्किय धोरणामुळेच आज शहरातील नागरीकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहेत. युवा टायगर फोर्स कडून या विषयावर स्थानिक नगर परिषद प्रशासनाला वारंवार अवगत करून दिले होते, मात्र राजकीय दबावात काम करणारे मुख्याधिकारी यांची काम करण्याची मानसिकता दिसून येत नसल्यामुळेच नगर परिषद ला ताला ठोको आंदोलन देखील करण्यात आले होते. कधी काळी नावलौकिक पावलेल्या येथीलनगर परिषदेची ओळख आता हळूहळू कमी होऊ लागलेली आहेत. सद्यस्थितीत शहरातील नागरिक डेंगू, मलेरिया या आजाराने त्रस्त झाले असून आरोग्य विभाग पूर्णपणे धृतराष्ट्राची भूमिका घेत आहेत.शहरातील रस्त्यांवर जागोजागी पडलेली खड्डे, रस्त्यांच्या मधोमध वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशी उभी असलेली मोकाट जनावरे, श्वान, वराच यांचा वाढलेला मुक्त संचार, अशा अनेक कारणावरून येथील नगर परिषदसध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहेत. नगर परिषद मधील मुख्याधिकारी यांची प्रशासनावर पकड नसल्यामुळेच शहरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. या गंभीर विषयावर लक्ष घालून युवा टायगर फोर्स कडून येथील नगरपालिकेचा पदभार उप आयुक्त माधुरी मडावी यांच्याकडे देण्याची मागणी युवा टायगर फोर्स ने आमदार संदीप धुर्वे यांच्याकडे केली आहे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी यवतमाळ, दिग्रस मधील नगर पालिका प्रशासनाला स्वत रस्त्यांवर उतरून काम कसे करावे याची जाणीव करून दिली. वेळ प्रसंगी कठोर निर्णय घेण्यास देखील त्यांनी कोणतीच तमा बाळगली नाहीत. पांढरकवडा शहराला आज अशा कणखर मुख्याधिकरी मिळाल्यास शहरातील समस्यांचा लागलीच निपटारा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहेत.
Discussion about this post