माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने
पाथर्डी शहरातील मार्केट कमिटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामकथा समारोहास आजपासून सुरुवात होत आहे. कथेच्या आरंभापूर्वी शहरातील हजारो भाविकांनी पाथर्डी शहरात भव्य दिंडी व मिरवणुकीत उत्साहाने सहभाग घेतला.
लेझिम पथके, पवित्र वाद्यांच्या सुस्वराने दिंडी सोहळ्याला शोभा आली होती.
शहरातील महिला, नागरिक, युवक-युवतींनी श्रीरामकथाकार हभप समाधान महाराज शर्मा यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. त्यावेळी आमदार मोनिकाताई राजळे
श्री राहुल दादा राजळे, श्री कृष्णा राजीव राजळे, सो मोनाली राहुल राजळे, डॉक्टर मृत्युंजय गरजे, श्री विष्णुपंत अकोलकर, श्री बंडू शेठ बोरुडे, श्री सचिन वायकर, श्री अमोल गरजे श्री मुकुंद गरजे, श्री रमनशेठ लाहुटी आदी मान्यवर उपस्थित होते


पाथर्डी तालुका प्रतिनिधी
अक्षय वायकर
Discussion about this post