• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

चामोर्शीतील सुपीक जमिनी अधिग्रहणास काँग्रेसचा तीव्र विरोध -काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे

by
February 24, 2026
in Blog
0
0
SHARES
48
VIEWS

RelatedPosts

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Ad 1

नितेश गट्टीवार
चामोर्शी(गडचिरोली)दि.२४
महाराष्ट्र सरकारने उद्योग व विकासाच्या नावाखाली गडचिरोली जिल्हातील चामोर्शी तालुका येथे सिंचनाखालील व बारमाही पीक देणाऱ्या सुपीक शेतीजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निर्णयामुळे शेतकरी, कष्टकरी तसेच संपूर्ण गावांचे अस्तित्व धोक्यात आले असून, हा निर्णय जनहितविरोधी असल्याचा आरोप गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला आहे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनाच्या भूमिकेवर तीव्र टीका केली.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर महसुली व वनजमिनी उपलब्ध असताना, केवळ चामोर्शी तालुक्यातील नदीकाठच्या, सिंचनाखालील व अत्यंत सुपीक जमिनींचीच निवड का करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही जमीन शेतीची असून हजारो शेतकरी कुटुंबांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. मात्र उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भेंडाळा परिसरातील १४ गावांतील सुमारे ९ हजार एकर जमीन अधिग्रहण हा सातवा टप्पा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यापूर्वीचे सहा टप्पे कोणते व पुढील टप्प्यांची माहिती सरकार जाहीर का करत नाही, असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला आहे.
संपूर्ण तालुक्यात एमआयडीसी उभारण्याची योजना असताना, शेतकऱ्यांचा एकत्रित विरोध टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने जमीन अधिग्रहण केले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
जमीन गेल्यानंतर प्रत्यक्षात किती स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे, वृद्ध शेतकरी, महिला व कुटुंबांच्या उपजीविकेचे काय होणार, याबाबत शासनाकडे कोणतीही ठोस योजना नसल्याचे ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. स्थानिकांना रोजगार दिल्याची कोणतीही अधिकृत आकडेवारीही सरकारकडे नसल्याचे त्यांनी नमूद केले.
तालुक्यातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेला चिचडोह सिंचन प्रकल्प नेमका कुणासाठी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी उभारलेला प्रकल्प उद्योगांसाठी वापरला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
शासन आदेशात ही जमीन खाजगी उद्योगपतींना दिली जाणार असल्याचा स्पष्ट उल्लेख असताना, कमी दरात जमीन अधिग्रहित करून एमआयडीसीमार्फत देण्याऐवजी शेतकरी व उद्योगपती यांच्यात थेट चर्चा का घडवून आणली नाही, असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
यावेळी बोलताना ब्राह्मणवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारण्यामागे शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्हे, तर जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त करणारे निर्णय रेटून नेण्यासाठीच हे पद स्वीकारले आहे काय, असा गंभीर सवाल उपस्थित केला. “जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असते, तर सुपीक शेती व सिंचनाखालील जमिनी उद्योगपतींसाठी बळी दिल्या गेल्या नसत्या,” असे ते म्हणाले.
लोहप्रकल्पांमुळे आतापर्यंत अनेक कामगारांचे अपघातात मृत्यू झाले असून, त्यांच्या कुटुंबांना न्याय व कायमस्वरूपी रोजगार मिळाला आहे काय, याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले. तसेच चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील पेपर मिल बंद झाल्यामुळे अनेक कामगार बेरोजगार झाल्याचा मुद्दाही महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी मांडला.
या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून, येणाऱ्या काळात हा शासन आदेश रद्द होईपर्यंत भूसंपादन आदेशाची होळी, मुंडण आंदोलन,पैदल मार्च, सामूहिक जलसमाधी अशा पद्धतीने विविध टप्प्यावर आंदोलन करण्यात येणार असून रस्त्यावरच्या लढाई सोबतच , विधानसभा व लोकसभा तसेच न्यायालयीन लढाई लढली जाईल,अशी माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे,चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हाध्यक्ष पर्यावरण विभाग राजेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, माजी सरपंच दिवाकर निसार, माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, तृप्तीताई मंगर, विनोद येलमुले, लालाजी सातपुते, सुभाष कोठारे, रूपचंद भिवनकर, रामानंद जवादे, मुखरू शेंडे, चरणदास पोरटे, प्रकाश गेडाम, यादव मंगर, हीवराज लाटकर, बालाजी झोडे, विकास रायसिडाम, मोरेश्वर आभारे, मारुती उमलवार, दिगंबर धानोरकर, विवेक धोडरे, नीलकंठ सोमनकर, नीलम पोरंटे, प्रीतम देशमुख, भाऊजी सुरकर, सचिन निथरलावार, सुनील कन्नाके, विनय एलमुले, हेमंत कोवासे, गणेश पोरेड्डीवार, कवडू पुटकमवार, सतीश पुटकमवार, गंगाधर शेडमाके, कालिदास पाल, भिमराव ढेमस्कर, सुनील कोहपरे, हरीश मोहुर्ले, दिगंबर चापले, पीलदास सोयाम, जनार्धन म्हशाखेत्री, जानकीराम पोर्टे, अतुल उंदीरवाडे, राजेश्वर बांगरे, मनोज पोरटे व शेतकरी,पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

आरमोरी नगरपरिषद विकासकामांवर बैठक; राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चर्चा

Next Post

दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं

Related Posts

Blog

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
0
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी
Blog

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026
3
Blog

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026
41
Blog

मोबाईलच्या मायाजालातून मुलांना बाहेर काढा; पालकांनी संवाद वाढवावा

September 15, 2026
13
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पेणमध्ये वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष दक्षता

September 15, 2026
4
गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न
Blog

गणेशोत्सवानिमित्त पाथरी येथे शांतता समिती बैठक संपन्न

September 13, 2026
6
Next Post
दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं

दुर्दैवी! दहावीच्या विद्यार्थ्याचा कारच्या धडकेत मृत्यू; वडिलांच्या डोळ्यांदेखत सोडला जीव, नाशिक हळहळलं

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In