• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

श्रीगोंदा च्या विकासाचा नवा अध्याय; श्रीगोंदा नगरपरिषद चा दूरदृष्टीपूर्ण ऐतिहासिक निर्णय

by
February 28, 2026
in Blog
0
श्रीगोंदा च्या विकासाचा नवा अध्याय; श्रीगोंदा नगरपरिषद चा दूरदृष्टीपूर्ण ऐतिहासिक निर्णय
0
SHARES
20
VIEWS
Ad 1

श्रीगोंदा : नगरपरिषदेनं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेत शहराच्या प्रगतीचा नवा अध्याय सुरू केला आहे. नगराध्यक्षा सुनिता खेतमाळीस, उपनगराध्यक्षा अलका दरेकर (अनभुले), मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या अर्थसंकल्पीय बैठकीत शहराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. इतिहासाचा सन्मान, सांस्कृतिक वारशाचे जतन आणि आधुनिक सुविधांचा विस्तार यांचा समन्वय साधत शहराला प्रगतीच्या नव्या दिशेने नेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

या ऐतिहासिक निर्णयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकासाठी पारगाव रोड बायपास येथे ₹5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून हे स्मारक शहराच्या स्वाभिमानाचे आणि प्रेरणेचे प्रतीक ठरणार आहे. तसेच महात्मा ज्योतिराव फुले सर्कल बायपास परिसराच्या विकासासाठी ₹2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे शहराच्या ऐतिहासिक ओळखीला नवे बळ मिळणार असून नागरिकांमध्ये अभिमानाची भावना अधिक दृढ होणार आहे.

RelatedPosts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देण्यासाठी संत शेख महंमद महाराज देवस्थानाच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र पर्यटन योजनेअंतर्गत ₹10 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच भैरवनाथ देवस्थान परिसर आणि महादजी शिंदे इमारत, विजयचौक झेंडावेस आणि दिल्ली वेस यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहराचा ऐतिहासिक वारसा जतन होऊन धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळणार आहे.

नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा करण्यासाठी नगरपरिषदेनं शहरात अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असून स्वच्छता व्यवस्था मजबूत करणे, नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे आणि दर्जेदार रस्त्यांची उभारणी करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच ओपन जिम, सार्वजनिक बगीच्यांचे सुशोभीकरण, दिव्यांगांसाठी विशेष सुविधा आणि सौरऊर्जा प्रकल्पांना मंजुरी देऊन शहर अधिक सुरक्षित, आधुनिक आणि पर्यावरणपूरक करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

यासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या निवाऱ्याच्या मूलभूत गरजेला प्राधान्य देत इंद्रा नगर, सावित्रीबाई फुले नगर, वेळू रोड परिसर, सावंतवस्ती, सोनवणेनगर आणि गजानननगर येथील नागरिकांना पक्की आणि हक्काची घरे उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक आणि लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अल्पसंख्यांक समाजासाठी 5% निधी राखीव ठेवणे, संविधान भवन आणि बुद्धविहार उभारणे आणि विविध समाजघटकांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा सामाजिक समतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. नगरपरिषदेनं घेतलेले हे निर्णय शहराच्या उज्ज्वल, समृद्ध आणि स्वाभिमानी भवितव्यासाठी निर्णायक ठरणार असून नागरिकांमध्ये समाधान आणि आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

रावेर येथे थॅलेसिमिया रुग्णांसाठी भव्य रक्तदान शिबिर

Next Post

सातपुडा शिक्षक प्रसारक प्रसाद मंडळ विद्यावाडी धुळे संचलित शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे दि. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला..!

Related Posts

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी
Blog

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026
0
Blog

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
15
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री
Blog

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026
8
रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी
Blog

रासी अमेझे (RCH 999) कापूस वाणाची पीक पाहणी

September 25, 2026
3
कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात
Blog

कणकोरीत कोरड्या दुष्काळाची झळ; शेतकरी व पशुपालक संकटात

September 25, 2026
3
मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात
Blog

मुंजलवाडी गावातील गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 24, 2026
9
Next Post
सातपुडा शिक्षक प्रसारक प्रसाद मंडळ विद्यावाडी धुळे संचलित शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे दि. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला..!

सातपुडा शिक्षक प्रसारक प्रसाद मंडळ विद्यावाडी धुळे संचलित शारदा कन्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शहादा येथे दि. 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिवस साजरा करण्यात आला..!

ताज्या बातम्या

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

नागज जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी मल्लिका तांबोळी

September 25, 2026

डीजे वाजविल्याने लखमापूरच्या गणेश मंडळांवर गुन्हे

September 25, 2026
मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर मुख्यमंत्री

September 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In