• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. महिला आरोपीकडून गांजा जप्त…

by
March 1, 2026
in Blog
0
अवैध गांजा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. महिला आरोपीकडून गांजा जप्त…
0
SHARES
7
VIEWS
Ad 1

लातूर प्रतिनिधी – लातूर जिल्ह्यात अवैध अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. समाजात व्यसनाधीनता वाढविणाऱ्या तसेच तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात आणणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध लातूर पोलीस ठाम भूमिका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी गुप्त माहितीच्या आधारे प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला आहे.

दि. 26 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर शहरात अवैध अमली पदार्थांविषयी माहिती संकलन व कारवाई करण्याच्या अनुषंगाने गस्त घालत होते. त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, लातूर ते बार्शी रोडवरील उड्डाणपुलाजवळील माउलीनगर, हरंगुळ येथे एक महिला आपल्या घरामध्ये गांजाची साठवण करून त्याची विक्री करत आहे.

RelatedPosts

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलीस अधीक्षक, लातूर श्री. अमोल तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बावकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानेकायदेशीर प्रक्रियेचे पालन करूनसदर पथक माउलीनगर, हरंगुळ येथे पोहोचले. संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. घरामध्ये एक महिला आढळून आली. तिची ओळख मनिषा बालाजी चव्हाण (वय 30 वर्षे, रा. माउलीनगर, हरंगुळ, ता. जि. लातूर) अशी पटली. घराची तपासणी करण्यात आली असता लोखंडी कपाटामध्ये एका पांढऱ्या रंगाच्या पोत्यामध्ये गांजासदृश पदार्थ आढळून आला.

सदर पदार्थाची तपासणी केलीतेव्हा तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. पंचांच्या उपस्थितीत वजन केले असता एकूण 2 किलो 830 ग्रॅम गांजा मिळून आला असून त्याची अंदाजे किंमत रु. 56,600/- इतकी असल्याचे निष्पन्न झाले. मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. ही कारवाई नायब तहसीलदार श्री. गणेश अंबर, वजनमाप निरीक्षक श्री. टेकाळे, तसेच राज्य परिवहन महामंडळाचे पंच यांच्या उपस्थितीत पार पडली.सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचेपोलीस निरीक्षक श्री. बावकर,पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, तसेच पोलीस अमलदारसाहेबराव हाके, रियाज सौदागर, मोहन सुरवसे, सचिन धारेकर सुरेखा मदने, मनोज खोसे, प्रवीण कोळसुरे, आनंद हल्लाळे, संतोष खांडेकर, सुहास जाधव, चिखलीकर यांनी केली आहे. लातूर जिल्हा पोलीस दलाकडून अमली पदार्थांविरुद्ध कठोर कारवाई सुरू असून अशा बेकायदेशीर धंद्यांना अजिबात थारा दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच युवकांना व्यसनमुक्त ठेवण्यासाठी लातूर पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील आहे.

Previous Post

आजरा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी: गहाळ झालेले १० मोबाईल शोधून मूळ मालकांच्या स्वाधीन

Next Post

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

Related Posts

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट
Blog

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
0
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी
Blog

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026
5
Blog

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026
3
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज
Blog

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी लोणावळा शहर पोलीस सज्ज

September 24, 2026
2
गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Blog

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026
15
Blog

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
10
Next Post
श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

श्री भुलेश्वर माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

शिरूर शहरातील गणेश मंडळांना आमदार माऊलीआबा कटके यांची सदिच्छा भेट

September 24, 2026
देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

देगलूर तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा; छावाची मागणी

September 24, 2026

भाजी विक्रेत्यांकडून रोज १० रुपये कर; महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची मात्र कमतरता

September 24, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In