• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

by
March 1, 2026
in ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, यश निवड अभिनंदन, शिक्षण, सामाजिक
0
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

Oplus_16908288

0
SHARES
28
VIEWS
Ad 1

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सर्वानुमते निवड झाली. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. संस्थेच्या 85 वर्षांच्या कारकिर्दीत पहील्या महिला अध्यक्ष होण्याचा मान सुनेत्रा पवार यांना मिळाला. तथापि वीस वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अजित पवार यांनी संस्थेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीत गुणवत्तेच्या शिखरावर पोचविले.

RelatedPosts

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

      संस्थेच्या जिल्ह्यात 16 पूर्व प्राथमिक, 16 प्राथमिक, 56 माध्यमिक, 31 उच्च माध्यमिक शाळा आहेत. 23 ठिकाणी व्यवसाय अभ्यासक्रम कोर्सेस चालू आहेत. कला, वाणिज्य आणि विज्ञान विभाग असलेली आठ पारंपारिक महाविद्यालये आहेत. तसेच फार्मसी पदविकेची तीन, पदवीची तीन, एमबीएची दोन, लॉ, आयुर्वेद, इंजिनिअरींग आणि आर्किटेक्टचे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे. या विविध शाखांतून 84064 विद्यार्थी शिक्षण घेत असून 3697 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत.

      सप्टेंबर 2006 मध्ये अजित पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शैक्षणिक आणि गुणात्मक विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले. संस्थेच्या सर्व शाखांच्या इमारती अद्ययावत सोई-सुविधायुक्त केल्या. अप्रगत विद्यार्थ्यांसाठी अविष्कार गुणवर्धन, डीजीटल स्टुडीओद्वारे ऑनलाईन अध्यापन, कॉग्नेटिव्ह एक्सचेंज, लिड टू एक्सेल, अटल टिंकरींग लॅब, बीआयएस, विद्यार्थी समुपदेशन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, संशोधन प्रोत्साहन कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, तंज्ञांची व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे, औद्योगिक भेटी, विद्यार्थी अपघात विमा योजना असे विविध उपक्रम सुरू केले.

काळाची गरज ओळखून त्यांनी ठिकठिकाणी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या खेळाला वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय क्रिडामहोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते. त्यांच्या या उपक्रमामुळे संस्थेच्या दहावी, बारावीचा निकाल पुणे जिल्हा, पुणे विभाग तसेच राज्याच्या तुलनेत जास्त असतो. अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहेत. कला, क्रिडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पदके मिळविली आहेत. परदेशातील नामांकित विद्यापीठांबरोबर केलेल्या संशोधन, शैक्षणिक कराराचा विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांना उपयोग होतो.

      28 जानेवारीला विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संस्थेचे अध्यक्षपद रिक्त राहीले होते. रविवारी (1 मार्च) संस्था सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात झाली. संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सर्वप्रथम अजित पवार, विमानात असलेले अंगरक्षक तसेच वैमानिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मानद सचिव अॅड.संदीप कदम यांनी मांडला. त्यास सर्व सभासदांनी अनुमोदन दिले. त्यानुसार उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सूनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी संस्थेचे खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव ए.एम.जाधव यांच्यासह संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते. एल.एम.पवार यांनी आभार मानले.
Previous Post

निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ पेन्शन,आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे रक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्वाची भूमिका बजावते…

Next Post

प्रतापसिंह विद्यालयाचे क्लर्क काळाच्या पडद्याआड

Related Posts

ताज्या घडामोडी

पेडगाव परिसरात बिबट्याचे दर्शन; शेतकरी-ग्रामस्थांमध्ये भीती पिंजरा लावून गस्त वाढविण्याची वन विभागाकडे ग्रामस्थांची मागणी

September 23, 2026
2
शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
ताज्या घडामोडी

शहाद्यात नमो बाईक रॅलीचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

September 23, 2026
0
बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
ताज्या घडामोडी

बीजगणपती व सीड बॉलच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 23, 2026
2
गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन
ताज्या घडामोडी

गर्जेवाडीचा आदर्श; ‘एक गाव, एक गणपती’सह पर्यावरणपूरक विसर्जन

September 23, 2026
29
कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू
ताज्या घडामोडी

कोलगाव येथे २६ वर्षीय विवाहितेचा मृत्यू; पोलिस तपास सुरू

September 22, 2026
183
शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
ताज्या घडामोडी

शांतीनगरच्या राजाचे भव्य रूप; १५ फुटी गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

September 22, 2026
65
Next Post
प्रतापसिंह विद्यालयाचे क्लर्क काळाच्या पडद्याआड

प्रतापसिंह विद्यालयाचे क्लर्क काळाच्या पडद्याआड

ताज्या बातम्या

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गौरी-गणपती सजावट स्पर्धेला शिरूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

September 23, 2026

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

September 23, 2026
मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

मुंजलवाडीत गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात

September 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In