• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ पेन्शन,आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे रक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्वाची भूमिका बजावते…

by
March 1, 2026
in देश विदेश
0
निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ पेन्शन,आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे रक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्वाची भूमिका बजावते…
0
SHARES
58
VIEWS
Ad 1

निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ पेन्शन,आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे रक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्वाची भूमिका बजावते….

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

प्रतिनिधी :- दरीकांत कोळेकर, सारथी महाराष्ट्राचा न्यूज.

कुरुंदवाड :- निवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ, पेन्शन, आरोग्य सुविधा आणि कायदेशीर हक्काचे संरक्षण करण्यासाठी सेवानिवृत्त संघटना महत्त्वाची भूमिका बजावते. राज्य सरकारी, निमसरकारी व शिक्षकांनी आपल्या निवृत्तीनंतर अडचणी सोडवण्यासाठी सेवानिवृत्त संघाचे सदस्य होणे आज काळाची गरज आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त संघाचे सुरेश कांबळे यांनी केले.

शिरोळ तालुका निवृत्त सेवा संघाची नगर वाचनालयामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा संघाचे वसंतराव थोरात व लालासो कुंभार होते. तर अध्यक्षस्थानी महसूल विभागाचे सेवानिवृत्त अधिकारी धोंडीराम कोठावळे होते.

ते पुढे म्हणाले की, सेवानिवृत्त संघटना कर्मचाऱ्यांच्या सामुहीक हिताचे प्रतिनिधित्व करते. सेवानिवृत्तांना पेन्शन, आरोग्य व इतर फायदे यासाठी एकत्र येऊन मदत करते. कार्यक्षमता, संप्रेषण, समन्वय, अधिकार आणि जबाबदारी पार पाडते. संघटना म्हणजे सामान्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एकत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा संरचित गट. हे सदस्यामधील भूमिका जबाबदारी आणि संबंध परिभाषित करण्यासाठी कार्यक्षम आणि प्रभावी काम सुलभ करण्यासाठी शासकीय पातळीवर काम करतात. यावेळी बोलताना लालासो कुंभार म्हणाले की, औपचारिक संघटना नियम आणि कार्यपद्धतीवर आधारित असते. तर अनौपचारिक संघटना लोकांच्या वृत्ती आणि भावनांवर आधारित असते. ती काम करणाऱ्या आणि एकमेकांशी जोडणाऱ्या लोकांमधील अनौपचारिक सामाजिक संपर्कावर अवलंबून असते. संघटना म्हणजे विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी एकत्र काम करणाऱ्या लोकांचा समूह, संघटनात्मक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लोक आणि क्रियाकलापांचे गटबद्ध करण्यात अधिकार आणि जबाबदारी स्थापित करतात. आणि लोकांशी संवाद साधण्यात व्यवस्थापकाची मध्यवर्ती भूमिका बजावते.

यावेळी बोलताना वसंतराव थोरात म्हणाले की, सेवानिवृत्तीनंतर लोकांनी फिरणे, हासणे, योगा करणे, चालणे व आहारावर नियंत्रण ठेवल्यास आरोग्य चांगले राहते. आज अनेक ठिकाणी सेवानिवृत्तीनंतर ही लोक ताणतणावात राहत असतात. तो ताण कमी करण्यासाठीच लोक सध्या हास्यक्लबला जात आहेत. आणि हास्यामुळे मन प्रफुलित राहते मनावरचा ताणतणाव कमी होतो. त्यामुळे आयुष्यमान वाढते. यासाठी लोकांच्या समूहात राहणे गरजेचे आहे.

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक तालुका संघटनेचे अध्यक्ष शरद कडाळे यांनी केले. यावेळी येथील माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, जयराम बापू पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अहवाल वाचन सदस्य शांतगोंडा पाटील यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार धोंडीराम कोठावळे यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी आभार नंदकुमार सुतार यांनी मानले.

या सभेला केशव देशपांडे, बाळासो भोई. दुंडया स्वामी, सुरेंद्र कोडोले, राजमहंमद गरगरे, श्रीकांत मोहिते, अल्ताफ बाणदार, धोंडीराम कांबळे, परसराम गायकवाड, अल्लानूर मुल्ला, सुरेश कांबळे, डी.वाय. चव्हाण या मान्यवरासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

महाराष्ट्र भूषण आदरनिय.डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने माळशिरस येथे स्वच्छता अभियान

Next Post

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
देश विदेश

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

March 19, 2026
4
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
Next Post
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

ताज्या बातम्या

“नंदुरबार जिल्ह्यातून पनौती गेली” म्हणत आदिवासी बांधवांनी फटाके फोडून नाचत साजरा केला आनंदोत्सव व जल्लोष!

May 2, 2026
निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

निमसाखर गावात श्री स्वामी समर्थ महाराजांची पौर्णिमा उत्साहात साजरी

May 2, 2026

दाभा गावात पाणीटंचाईचे गंभीर संकट. २०दिवसातून एकदा होतो पाणीपुरवठा

May 2, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In