आज मिरजेमध्ये राज्य उत्पादन शुल्प विभागाने धडक कारवाई करत गोवा मेंड देशी दारूचा तब्बल ७१ लाख ३६ हजार रुपये किमतीचा मोठा साठा हॅशटॅग केला विशेष म्हणजे हि मद्य तस्करी औषधांच्या अडून केली जात असल्याचे निष्पन्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरज निरीक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले कि, आमच्या विभागाचे आयुक्त राजेश देशमुख तसेच सह आयुक्त दक्षता आणि अंमलबजावणी प्रसाद सुर्वे यांच्या आदेशान्वये कोल्हापूर विभागाचे उपायुक्त विजय चिंचाळकर आणि जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आमच्या मिरज कार्यालयाच्या पथकाने १ मार्च रोजी सकाळी ७ च्या सुमारास मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर म्हैसाळ फाट्याजवळील रस्त्यावर सापळा रचून गोवा मेड देशी मद्याचा अवैधरित्या वाहतूक करणारा दहा चाकी कंटेनर MH४० CT २८१४ या वाहनावर छापा टाकला असता राज्याचा महसूल चुकवून आयात होत असलेला मोठा देशी मद्य साठा यामध्ये कोकण संत्रा ९९९ रॉकेट संत्रा सिमला संत्रा गोवा नंबर १ देशी मद्य अशा विविध पद्धतीच्या देशी मद्याचा साठा मिळून आला. त्याची एकूण किंमत ४१ लाख ३६ हजार इतकी आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कारवाई करून आम्ही हे वाहन मुद्देमालासह ताब्यात घेऊन कारवाई केली आहे सादर वाहनामध्ये बनावट नंबर प्लेट्स MH ४६ BM ५७५१ WB २३ F ७८७६ आढळून आल्या आहेत. या गाडीचा अधिक तपस केला असता यामध्ये काही बनावट औषध बिले मिळाली ती मे एरिस्टो फार्मास्युटिकल्स प्रा लि भोपाल मध्यप्रदेश, मे निकिता फार्मास्युटिकल्स प्रा लि नागपूर आणि मे रुसन फार्मा लि अंकलेश्वर गुजरात अशा कंपन्यांच्या नावावर आहेत. या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाडीसह एकूण मुद्देमाल ७१ लाख ३६ हजार किमतीचा आहे. या गाडीसह लभंजित गुरमेज सिंह वय ३२ वर्षे रा पिलभीत उत्तरप्रदेश याला ताब्यात घेतले आहे. या इसमाची आम्ही अधिक चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितले कि हा मुद्देमाल गोवा राज्यातून वाहतूक करून पुढे नागपूर कडे जाणार होता. सदर आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६५ (अ) (ई)८०,८१,८३ आणि ९० गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या मोहिमेमध्ये मिरज विभागाचे निरीक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे यांच्यासह दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पोवार, जयसिंग खुंटावळे तसेच सहा दुय्यम निरीक्षक इरफान शेख, विनायक खांडेकर जवान स्वप्नील कांबळे श्रीमती कविता सुपने, श्रीमती शाहीन शेख यांनी सहभाग घेतला अधिक तपास निरीक्षक तथा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे करीत आहेत.










