• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गातेगाव यांची संयुक्त मोहीम; गावठी पिस्टलसह तीन संशयित जेरबंद.

by
March 2, 2026
in Blog
0
स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन गातेगाव यांची संयुक्त मोहीम; गावठी पिस्टलसह तीन संशयित जेरबंद.
0
SHARES
32
VIEWS
Ad 1
Ad 1

लातूर प्रतिनिधी –

लातूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने अवैध शस्त्रांविरुद्ध विशेष मोहीम सुरू ठेवली असून त्याच मोहिमेअंतर्गत पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व पोलीस स्टेशन गातेगाव यांच्या संयुक्त पथकाने मुरूड-अकोला चौक परिसरात छापा टाकून गावठी पिस्टलसह तीन संशयित इसमांना ताब्यात घेतले.मिळालेल्या माहितीनुसार, दि. 28 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे सुमारे 04.00 वाजण्याच्या सुमारास पोलीस स्टेशन गातेगाव येथील अधिकारी व कर्मचारी शासकीय वाहनाने हद्दीत नियमित नाईट पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली.

RelatedPosts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

मुरूड-अकोला चौक परिसरात काही संशयित इसम थांबले असून त्यांच्याकडे अवैध शस्त्र असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाल सुरू केली.सदर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व गातेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या साखरा पाटी परिसरात एकत्र येत पुढील कारवाईचे नियोजन केले.

पोलिसांनी मुरूड-अकोला चौक येथे पहाटे सुमारे 04.30 वा. सापळा रचून छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच तेथे उभे असलेले तीन इसम गोंधळलेल्या अवस्थेत दिसले. पोलिसांनी पाठलाग करत तत्परतेने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली.चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली 1)अजय गौतम लोमटे (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)2)नयन सुधाकर वाडे (वय 26 वर्षे, रा. गंगासागर नगर, परळी वैजनाथ, जि. बीड)3)सोमेश्वर सुभाष मिसाळ (वय 20 वर्षे, रा. फुलेनगर, परळी जि. बीड)

यापैकी अजय गौतम लोमटे याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक स्टीलची गावठी पिस्टल व मॅगझीन असा ₹30,000/- किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी तत्काळ पंचनामा करून सदर शस्त्र जप्त केले.आरोपीकडे शस्त्राचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले.त्यामुळे पोलीस स्टेशन गातेगाव येथे शस्त्र अधिनियम कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या शस्त्राचा वापर कोणत्या गुन्ह्यासाठी केला जाणार होता का याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा, लातूर व पोलीस स्टेशन गातेगाव यांच्या संयुक्त पथकाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस ठाणे गातेगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे पोलीस अंमलदार संजय कांबळे, रियाज सौदागर, प्रदीप स्वामी, जमीर शेख, प्रशांत स्वामी, विजय पाटील, व्यंकटेश निटूरे, आयुब शेख यांनी केली आहे. सदरच्या पथकाच्यासतर्कता, जलद नियोजन व समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी ठरली असून त्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या व गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कारवाई पुढेही अशाच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.

Ad 1
Previous Post

भगवान शिव हे अत्यंत दयाळु आहे…ह.भ.प श्रावण महाराज

Next Post

मिरजेत ‘राज्य उत्पादन’ ची धडक कारवाई; औषधांच्या नावाखाली लाखो रुपये किमतीची अवैध वाहतूक करणारा गोवा मेड देशी दारू चा साठा हस्तगत

Related Posts

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
3
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान
Blog

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
10
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश
Blog

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026
9
माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!
Blog

माजलगाव तालुक्यातील सोमठाण्यात पार पडला एक अत्यंत प्रेरणादायी आणि आदर्श विवाह!

October 9, 2026
3
सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.
Blog

सेलू तहसील कार्यालयात सेवा संकल्प अभियान.

October 9, 2026
29
सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Blog

सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पालम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

October 9, 2026
8
Next Post
मिरजेत ‘राज्य उत्पादन’ ची धडक कारवाई; औषधांच्या नावाखाली लाखो रुपये किमतीची अवैध वाहतूक करणारा गोवा मेड देशी दारू चा साठा हस्तगत

मिरजेत 'राज्य उत्पादन' ची धडक कारवाई; औषधांच्या नावाखाली लाखो रुपये किमतीची अवैध वाहतूक करणारा गोवा मेड देशी दारू चा साठा हस्तगत

ताज्या बातम्या

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

सेवा संकल्प अभियानांतर्गत उगवा मंडळात ‘सेवा ज्योती यात्रा’ उत्साहात

October 9, 2026
सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

सह्याद्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (SIMRS) ला मुंबईत ‘स्टार एज्युकेशन बेस्ट कॉलेज अवॉर्ड २०२६’ प्रदान

October 9, 2026
तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

तालुकास्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पी. एस. एम. एस. इंग्रजी माध्यम शाळेचे घवघवीत यश

October 9, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In