परभणी /प्रतिनिधी :- रमेश मुलगीर
दि. १६ मार्च २०२६मानवत जिपरभणी
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “करिअर कट्टा” उपक्रमांतर्गत आयोजित विभागीय महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये के. के. एम. महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करत एकूण चार पुरस्कार पटकावले.
भोकर येथे आयोजित २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील प्रमाणपत्र (पुरस्कार) वितरण सोहळ्यात महाविद्यालयाचे करिअर कट्टा समन्वयक डॉ. पंडित मोरे यांना “उत्कृष्ट तालुका समन्वयक” म्हणून प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच महाविद्यालयाला “उत्कृष्ट जिल्हास्तरीय महाविद्यालय” म्हणून द्वितीय क्रमांक, “उत्कृष्ट करिअर संसद” म्हणून तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
याशिवाय, जिल्हास्तरीय रिल्स स्पर्धेमध्ये कुमारी पायल वाघमारे हिने प्रथम क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या यशात भर घातली. अशा प्रकारे महाविद्यालयाने चार मानाचे पुरस्कार मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिगंबरराव बिंदू महाविद्यालय, भोकर यांच्या संस्थाचालक डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपअधीक्षक श्री. होगे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत शितोळे, तसेच प्राचार्य डॉ. मोहन खताळ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, प्राचार्य डॉ. पंजाब चव्हाण, विभागीय समन्वयक डॉ. सतीश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. विभागीय समन्वयक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
पुरस्कार स्वीकारताना करिअर कट्टा समन्वयक डॉ. पंडित मोरे यांच्यासोबत करिअर संसदेमधील विद्यार्थीनी मुख्यमंत्री पायल वाघमारे, कौशल्य विकास मंत्री कुमारी प्रीती उपाडे आणि सामान्य प्रशासन मंत्री भाग्यश्री बोरकडे उपस्थित होत्या.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार कत्रुवार, सचिव बालकिशन चांडक, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीप हिबारे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि प्राचार्यांनी महाविद्यालयाचे अभिनंदन केले.
या यशामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, पर्यवेक्षक प्रा. अनिल कापसे, आयक्यूएसी प्रमुख डॉ. कैलास बोरुडे, कार्यालयीन अधीक्षक गणेश उभाळे तसेच करिअर कट्टाचे हरिभाऊ वाघमारे, करिअर कट्टा समन्वयक, करिअर संसदेमधील विद्यार्थी, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.
या पुरस्कारामुळे महाविद्यालय परिसरात आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे.









