• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

महापालिकेच्या ‘अमृत सखीं’चा दिल्लीत गौरव; ‘अमृत २.०’ अंतर्गत महिला बचत गटांनी गाजवली दिल्ली 

by
March 19, 2026
in देश विदेश
0
0
SHARES
4
VIEWS
Ad 1

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्या उपस्थितीत भारत मंडपम येथे संपन्न झाला ‘अमृत मित्र’ सोहळा 

केंद्र शासनाच्या अमृत २.० अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत मित्र’ उपक्रमात सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील महिला बचत गटांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित विशेष सोहळ्यात सांगलीतील ७ महिला प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून जणू दिल्ली गाजवली. महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या विशेष प्रयत्नातून हा दिल्ली दौरा महिला बचत गटांसाठी शक्य झाला. केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मा. श्री. मनोहर लाल खट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हा ‘अमृत मित्र’ कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सांगलीतील तेजस्विनी महिला बचत गट आणि समर्थ महिला बचत गट यांमधील खालील महिला प्रतिनिधींचा गौरव करण्यात आला:या दोऱ्यामध्ये महिला बचत गटांच्या शिष्टमंडळामध्ये शारदा माळी, संगीता मंडले, राजश्री कोरे, वैशाली कोळी, वैशाली सर्वदे, सुलोचना कोळी आणि रेश्मा कांबळे. या महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या.  संघटक सदाशिव हंकारे यांनी या पथकाचे तांत्रिक नेतृत्व केले. या कार्यक्रमामुळे सांगलीतील महिलांना विविध राज्यांतील महिला बचत गटांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्या यशस्वी प्रयोगांची माहिती घेण्याची संधी मिळाली. उद्यान देखभाल आणि स्वच्छतेचे काम करणाऱ्या या महिलांना आपला व्यवसाय अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा वाढवावा, याचे मार्गदर्शन मिळाले.  दिल्लीतील ‘भारत मंडपम’ सारख्या जागतिक दर्जाच्या वास्तूत झालेला सत्कार महिलांचा आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे.या उपक्रमासाठी उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी अश्विनी पाटील, समाज विकास अधिकारी नितीश माळी, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती सरवदे, मतीन अमीन आणि किरण पाटील यांनी विशेष परिश्रम घेऊन महिलांना राष्ट्रीय मंचावर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली. याया यशस्वी दिल्ली दौऱ्याबद्दल आयुक्त सत्यम गांधी म्हणाले “अमृत २.० अभियानांतर्गत केवळ पायाभूत सुविधाच नव्हे, तर महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे आमचे ध्येय आहे. दिल्लीतील या गौरवामुळे इतर बचत गटांनाही प्रेरणा मिळेल आणि महिला अधिक उत्साहाने शहर स्वच्छतेच्या कामात सहभागी होतील.” या संधीमुळे महिलांनी प्रशासनाचे आभार मानले असून, भविष्यात अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

RelatedPosts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

Previous Post

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

Next Post

गुढी पाडवा: महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान, नववर्षाची मंगल सुरुवात

Related Posts

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास
देश विदेश

वर्धा जिल्ह्यात गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश; अनेक गुन्ह्यांचा शंभर टक्के तपास

April 18, 2026
38
ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई
खेळ

ओशनमॅन क्रॅबी २०२६ मध्ये तनय लाडचा ‘सुवर्ण’ धमाका; थायलंडमध्ये ३ पदकांची ऐतिहासिक कमाई

March 29, 2026
14
गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा
देश विदेश

गावाच्या सहभागातून शिक्षणाची नवी दिशा

March 20, 2026
21
के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त
देश विदेश

के. के. एम. महाविद्यालयाला करिअर कट्टाचे चार पुरस्कार प्राप्त

March 19, 2026
5
छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी
Blog

छत्रपती शिवाजीमहाराज उद्यानासाठी जत नगरपरिषद हद्दीत दोन एकर जागा उपलब्ध करून द्यावी

March 19, 2026
19
मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान
देश विदेश

मानोली गावच्या ग्रामरोजगार सेवक हटवायला घेतले मतदान

March 19, 2026
5
Next Post

गुढी पाडवा: महाराष्ट्राच्या परंपरेचा अभिमान, नववर्षाची मंगल सुरुवात

ताज्या बातम्या

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

नसरापूरमध्ये चिमुकलीच्या हत्येने खळबळ; आरोपी अटकेत

May 3, 2026

अहेरी येथे साई प्रगटदिनानिमित्त महापूजा व महाप्रसादाचे आयोजन

May 3, 2026

माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा; गुरुजनांचा होणार सत्कार

May 3, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In